मुंबईत सर्वत्र एटीएममध्ये खडखडाट

By admin | Published: November 15, 2016 05:29 AM2016-11-15T05:29:18+5:302016-11-15T05:29:18+5:30

गुरू नानक जयंतीच्या सार्वजनिक सुटीनिमित्त राज्यातील सर्व बँका बंद असल्याने लोकांच्या त्रासात सोमवारी आणखी भर पडली. गेल्या पाच दिवसांपासून बँकांबाहेर

Rocks at ATMs everywhere in Mumbai | मुंबईत सर्वत्र एटीएममध्ये खडखडाट

मुंबईत सर्वत्र एटीएममध्ये खडखडाट

Next

मुंबई : गुरू नानक जयंतीच्या सार्वजनिक सुटीनिमित्त राज्यातील सर्व बँका बंद असल्याने लोकांच्या त्रासात सोमवारी आणखी भर पडली. गेल्या पाच दिवसांपासून बँकांबाहेर लागणाऱ्या रांगा सोमवारी एटीएमबाहेर लागल्या होत्या. मात्र अतिवापराने काही वेळेतच रोकड संपल्याने एटीएम सेवाही सोमवारी दुपारी कोलमडली.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) रविवारी रात्री बँक आणि एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रकमेसह नोटा बदलून देण्याच्या रकमेतही वाढ केली. त्यानुसार प्रत्येक ग्राहकाला आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची परवानगी मिळाली आहे. शिवाय एटीएममधून अडीच हजार आणि नोटा बदलून देण्याची मर्यादा ४ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सोमवारी सार्वजनिक सुटीनिमित्त बँक बंद असल्याने नागरिकांना नोटा बदलून घेता आल्या नाही. खात्यातून पैसा काढण्यासाठी एटीएमचा आधार होता. परिणामी पहाटेपासून नागरिकांनी एटीएमबाहेर रांगा लावल्या होत्या. काही नागरिकांना तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतरही एटीएममधील रोकड संपल्याने पैशांअभावीच हात हलवत परतावे लागले.
मुंबईतील बहुतांश एटीएम बंद असल्याने उरलेल्या एटीएमबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंगळवारी बँक पुन्हा उघडणार असून यावेळी एटीएम सेवाही मोठ्या संख्येने कार्यरत होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांच्या मानाने अधिक रोकड बँकांकडे असून बहुतेक एटीएम सेवाही कार्यरत होण्याचा दावा सरकारने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rocks at ATMs everywhere in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.