Rohit Pawar: 'झुंड जातीभेदावर प्रकाश टाकतो, मी चित्रपटगृहात जाऊन बघणार, तुम्हीही पाहा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 07:19 PM2022-03-04T19:19:09+5:302022-03-04T19:21:27+5:30

नागराज मंजुळेंच्या झुंडची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे, या चित्रपटाच्या समर्थनार्थ आणि विरोधातही काहीजण मत मांडत आहेत.

Rohit Pawar: 'Jhund movie shed light on caste discrimination, I will go to the cinema and see you too' | Rohit Pawar: 'झुंड जातीभेदावर प्रकाश टाकतो, मी चित्रपटगृहात जाऊन बघणार, तुम्हीही पाहा'

Rohit Pawar: 'झुंड जातीभेदावर प्रकाश टाकतो, मी चित्रपटगृहात जाऊन बघणार, तुम्हीही पाहा'

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित ‘झुंड’ आज प्रदर्शित झालाय आणि सध्या सर्वत्र या आणि याच चित्रपटाची चर्चा आहे. अगदी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान पासून साऊथचा सुपरस्टार धनुषपर्यंत सगळ्यांनी  ‘झुंड’ (Jhund) बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे. फॅन्ड्री, सैराटनंतर नागराजचा झुंड सिनेमा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियातून या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यातच, आता आमदार रोहित पवार यांनीही या चित्रपटाला चित्रपटात जाऊन पाहण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय.  

नागराज मंजुळेंच्या झुंडची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे, या चित्रपटाच्या समर्थनार्थ आणि विरोधातही काहीजण मत मांडत आहेत. मात्र, अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटावरुन नागराज मंजुळेंवर आणि चित्रपटावर स्तुतीसुमने उधळली आहेत. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन झुंड सिनेमाचं कौतूक करणारं मत मांडलं आहे. 


'फँड्री' व 'सैराट'च्या यशानंतर नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या फुटबॉल टिमवर आधारित त्यांचा 'झूंड' हा चित्रपट समाजातील जातीभेदावर प्रकाश टाकतो. मी चित्रपटगृहात जाऊन #Jhundthemovie बघणार आहे, तुम्हीही बघा !, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. 

सुबोध भावे अन् जितेंद्र जोशीनेही केलं कौतूक

मराठी अभिनेता सुबोध भावे यानेही ‘झुंड’आणि नागराज यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता जितेन्द्र जोशी ( Jitendra Joshi) याने तर या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज यांच्यावर कौतुकाचा असा काही खुद्द नागराजही भारावले. काही क्षणांपूर्वी जितेन्द्र जोशीने नागराज यांच्यासोबतीने इन्स्टावर लाईव्ह येत ‘झुंड’चं भरभरून कौतुक केलं. ‘झुंड’सारखा सिनेमा फक्त नागराजचं करू शकतो. तू महानायक आणि महामानवाला एका फ्रेममध्ये आणलंस...,’ अशा शब्दांत त्याने नागराज यांचं कौतुक केलं. 

अजिबात न लपवलेला, विदाऊट मेकअप असलेला चेहरा... ‘झुंड’ अगदी तसा आहे. तीन दिवसांपूर्वी मी हा सिनेमा पाहिला...काय सिनेमा केलाये त्याने. अमिताभ बच्चन... असा बच्चन मी पाहिलाच नाही. सगळी नवी पोरं तर कम्माल आहे. लई डेंजर... फारच डेंजर पिक्चर बनवलाय... म्हणून मी लाईव्ह करतोय, असं  जितेन्द्र म्हणतो आणि यानंतर त्याच्यासोबत नागराज सुद्धा लाईव्ह येतात.
 

Web Title: Rohit Pawar: 'Jhund movie shed light on caste discrimination, I will go to the cinema and see you too'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.