मुंबई : मागच्याच रविवारी जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. या दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील मुलांच्या शिक्षणातील वडिलांची भूमिका जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते. आतापर्यंत आईच विद्यार्थ्यांचा अभ्यास घेते, अशी समजूत प्रचलित आहे. मात्र, या सर्वेक्षणातील २,१३७ सहभागींच्या मते आणि प्रतिक्रियांमधून ही समजूत चुकीची बनत चालल्याचे समोर आले आहे. कारण, तीन चतुर्थांशपेक्षा जास्त सहभागी विद्यार्थ्यांनी (७६.३%) आपल्या शैक्षणिक प्रगतीत वडिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत नोंदवले.
४८.६% विद्यार्थ्यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या आधी आणि नंतरच्या स्थितीत वडिलांची मुलांच्या शिक्षणातील भूमिका सारखीच राहिली आहे, तर २१.४% विद्यार्र्थ्यांनी लॉकडऊन काळात शैक्षणिक उपक्रमात, शैक्षणिक प्रगतीत वडिलांचा सहभाग वाढल्याचे सांगितले.हे सर्वेक्षण करणारी संस्था ब्रेनलीचे राजेश बिसानी म्हणाले, ब्रेनलीसारख्या आॅनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर त्यांच्या पालकांमध्येही आॅनलाइन शिक्षणाची लोकप्रियता वाढत आहे. त्यातही वडिलांच्या सहभागामुळे मुले त्यात अधिक रस घेत असल्याचे दिसून आले आहे.घरात कैद झाल्याचा असाही उपयोगमागील महिन्यात ब्रेनलीने ‘मदर्स डे’निमित्त आणखी एक सर्वेक्षण घेतले होते. त्यातही यासारखाच ट्रेंड पाहायला मिळाला होता. सहभागींपैकी ४८.५ टक्के मुलांनी वडील अभ्यासात मदत करतात, असे सांगितले होते. यामागील सर्व्हेमध्ये हेही अधोरेखित झाले होते की, घरून अभ्यास सुरू होण्यापूर्वी ४४.४ टक्के मुलांचे वडील त्यांना अभ्यासात मदत करत नव्हते. मात्र आता लॉकडाऊनमुळे बरेचसे पालक घरात कैद झाले आहेत. मुलांना वेळ देणे त्यांना शक्य होत आहे. त्यातच आॅनलाइन शिक्षणाचे मंच वाढल्याने लॉकडाऊन काळात मुलांच्या शिक्षणात वडिलांचा सहभाग वाढत आहे.