समाजाच्या उत्थानात मीडियाची भूमिका रचनात्मक - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 03:27 AM2020-10-19T03:27:00+5:302020-10-19T03:31:07+5:30

विश्व मूल्य दिनाच्या निमित्ताने ब्रह्माकुमारीजतर्फे आयोजित ‘मीडियाची नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी’ या विषयावर आॅनलाइन चर्चासत्रात मुख्य वक्ते म्हणून विजय दर्डा यांनी आपले विचार मांडले.

The role of media in the upliftment of society is constructive says Vijay Darda | समाजाच्या उत्थानात मीडियाची भूमिका रचनात्मक - विजय दर्डा

समाजाच्या उत्थानात मीडियाची भूमिका रचनात्मक - विजय दर्डा

googlenewsNext


मुंबई : समाजाच्या उत्थानात मीडियाची भूमिका रचनात्मक आहे. विशेषत: प्रिंट मीडियावर आजही वाचकांचा विश्वास आहे. देशाच्या स्वातंत्र्याआधी आणि नंतर मीडियाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी राहिली. आजही मीडिया कर्तव्याचे पालन करीत आहे. वृत्तपत्रांची भूमिका कायमच सकारात्मक आणि विधायक राहिली आहे. मीडियाला हा विश्वास कायम ठेवावा लागेल. जर टीव्ही, डिजिटल आणि प्रिंट मीडियाने विश्वास गमावला तर वाचक आणि दर्शक ते खरेदी करणार नाहीत, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी केले.

विश्व मूल्य दिनाच्या निमित्ताने ब्रह्माकुमारीजतर्फे आयोजित ‘मीडियाची नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी’ या विषयावर आॅनलाइन चर्चासत्रात मुख्य वक्ते म्हणून विजय दर्डा यांनी आपले विचार मांडले.  या चर्चासत्रात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई आणि ब्रह्माकुमारीजचे प्रवक्ते आणि चॅनल हेड ब्रह्मकुमार करूणाकर शेट्टी यांनीही आपले विचार मांडले.

आपले विचार व्यक्त करताना दर्डा म्हणाले की, आज मीडिया नागरिकांच्या जीवनाचे अंग झाले आहे. त्यांची सुख - दु:खे, उत्कर्षाशी जोडले गेलेला आहे. आजही वृत्तपत्रे आणि टीव्ही देशाच्या निर्माणाशी तत्परतेने जोडले गेलेले आहेत. हो, काही अपवाद असू शकतात. त्यामुळे समाजात सर्वकाही अमंगल आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. जाहिराती आणि टीआरपीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की जाहिराती स्विकारणे चुकीचे नाही. मात्र त्या योग्य पद्धतीने स्विकारल्या गेलेल्या असाव्यात. कुठल्याही संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पोषण आणि ती संस्था चालवण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. वृत्तपत्रांबाबत बोलायचे तर आठ पानांचा अंक प्रसिद्ध करण्यासाठी दहा रूपये खर्च येतो. आजही सर्वात स्वस्त वृत्तपत्र भारतातच विकले जाते.

लोकमत समुहाचा उल्लेख करत ते म्हणाले वृत्तपत्रांनी कधीही नैतिक मूल्यांशी तडजोड केली नाही. समाजाचे अहित करील अशी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. याच कारणामुळे लोकमत महाराष्ट्रात आजही पहिल्या पायरीवर कायम आहे. लोकमत कायमच सामाजिक मुद्दे उचलत समाज आणि राष्ट्राच्या निर्माणात सक्रीय भूमिका निभावत आहे. लोकमत समुहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या सिद्धांतांचा उल्लेख करीत विजय दर्डा म्हणाले की खºया अर्थाने आमचे वाचक हे वृत्तपत्रांचे खरे मालक आहेत. मालकांनी स्वत:ला विश्वस्त समजावे. याच सिद्धांतांचे पालन करीत लोकमत ‘पत्रकारीता परमो धर्म:’ या सिद्धांतावर चालत आहे. याचमुळे आम्ही आठ कोटी वाचकांपर्र्यत पोहचू शकलो. सुमारे तीन लाख महिला लोकमत सखी मंचशी जोडल्या गेलेल्या आहेत. या मंचाची स्थापना माझी पत्नी ज्योत्स्ना दर्डाने केली होती. र्यावरणाच्या दृष्टीकोनातूनही लोकमतने एक विशेष बाब केली आहे. हा जगातील एकमात्र समुह असा आहे जो सौर उर्जेच्या माध्यमातून वृत्तपत्र प्रसिद्ध करतो. 

९५ टक्के मीडिया सकारात्मक - घई
सुभाष घई यांनी चित्रपट लेखनापासून पुर्व लेखकाच्या विचारांवर प्रकाश टाकत म्हटले की कहाणी अशी असावी की ज्यात आपण जिवनातील अनुभव प्रकट करू.  एक थीम असावी की, ज्या माध्यमातून समाजाला संदेश देत त्यामागील उद्देश स्पष्ट केला जाऊ शकेल. ती कहाणी प्रेक्षकांच्या हदयापर्यंत पोहचावी.  चित्रपटातील पात्रे सुयोग्य असावीत आणि शेवट असा असावा की जो आशेचा किरण दाखवेल. नकारात्मकतेने तो संपू नये. लोकमत असा मीडिया समुह आहे जो समाजाच्या प्रत्येक पैलूला सकारात्मक दिशा देत आहे, हा सर्वोत्तम आहे. मीडियाचे कार्य माहिती जनमानसापर्यंत पोहचवणे. हे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही असू शकते. ही मानवी प्रवृत्ती आहे की आपण नकारात्मकतेच्या दिशेने लवकर आकर्षित होतो. नकारात्मक बातम्यांमागील उद्देश लोकांना जागरूक करण्याचा असतो, समाजात अशांती पसरवण्याचा नाही. आजही ९५ टक्के मीडिया सकारात्मकताच दाखवत आहे. केवळ पाच टक्के असे आहेत जे नकारात्मक बातम्या अतिरंजितपणे सादर करतात. अशा मीडियामुळेच लहान मुलांच्या आणि निरागस लोकांच्या मनात नकारात्मक विचार वाढत आहेत. मीडियाला सामाजिक आणि सरकारी समस्या सादर करण्याची गरज आहे. हा असा व्यवसाय आहे की ज्यातील लोकांना बुद्धीजिवीच्या श्रेणीत ठेवले जाते. मीडियाने एका शिक्षकाच्या भूमिकेतून समाजाला दिशा द्यावी. याचप्रकारे चित्रपटही चांगले आणि वाईट या प्रकारचे असतात. चित्रपट म्हणजे एक नाटक आहे ज्यात वेदना, प्रेम, हिंसा असे सर्वकाही असते. उत्तम चित्रपटातून समाजाला संदेश देण्याचेच काम केले जाते. आपल्याला नकारात्मकतेतून सकारात्मकता वेगळे काढण्याची गरज आहे. 

जगात शांतीसाठीच प्रयत्न व्हावेत - करूणाकर शेट्टी 
ब्रह्मकुमार करूणा भाई यांनी सांगितले की ब्रह्माकुमारीज जगाला नैतिक शिक्षण प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज आम्ही धर्मापेक्षा अधिक व्यवसायाला मानतो. आपल्याला आपली नैतिक मुल्ये समजून घेण्याची गरज आहे. ब्रह्माकुमारीजच्या माध्यमातून आम्ही आॅनलाइन शिक्षण आणि समुपदेशनाचे कार्य करीत आहोत. देशात मीडियाची सुरूवात एक व्रत म्हणून झाली होती. आज हा एक व्यवसाय झाला आहे. अस्तित्व आवश्यक आहे, मात्र मीडियाने बातम्यांना सकारात्मकतेने सादर करण्याचा प्रयत्न केला तर जगात शांती कायम राहिल. आज टीव्ही चॅनेलमध्ये नंबर एकवर जाण्याची स्पर्धा आहे. देशातील कुठल्याही घटनेनंतर लोक मीडियाकडे पाहतात. अशात मीडिया आपापसात एक होत देश आणि जगाला एक सकारात्मक दिशा देऊ शकते. भारतीय संस्कृती विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमार संजय भाई यांनी केली.

Web Title: The role of media in the upliftment of society is constructive says Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.