- खलील गिरकरमुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचारी व अधिकाºयांसाठी जाहीर केलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला (व्हीआरएस) कर्मचारी व अधिकाºयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या कर्मचारी व अधिकाºयांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत त्यांचा ३१ जानेवारी हा कामाचा शेवटचा दिवस असणार आहे. याबाबत बीएसएनएल एम्प्लॉइज युनियनचे परिमंडळ खजिनदार गणेश हिंगे यांच्याशी साधलेला संवाद...बीएसएनएल कर्मचारी व अधिकाºयांची व्हीआरएस योजनेबाबत काय भावना आहे?बीएसएनएलच्या कर्मचाºयांचे वेतन गतवर्षी अनेकदा रखडले गेले. वेळेवर वेतन मिळाले नसल्याने कर्मचारी व अधिकाºयांमध्ये काहीसे साशंकतेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत स्वेच्छानिवृत्ती योजना मांडण्यात आल्याने कर्मचाºयांनी भविष्याचा विचार करून स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज केलेल्यांपैकी काही जणांनी स्वेच्छेने यासाठी अर्ज केले आहेत. तर अनेकांना अर्ज दाखल करण्यासाठी विद्यमान परिस्थितीने भाग पाडले आहे. वेतन मिळण्यात होणाºया रखडपट्टीने व भविष्याबाबत भीती निर्माण झाल्याने मध्यममार्ग म्हणून अनेकांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग पत्करला आहे.ज्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत त्यांना त्यांची विहित देणी वेळेवर मिळतील का? याबाबत त्यांच्या मनामध्ये संशय आहे का?स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाºयांना व अधिकाºयांना फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेला त्यांचे निवृत्तिवेतन मिळेल व त्यापुढेप्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये नियमितपणे निवृत्तिवेतन जमा होईल. निवृत्तिवेतन देण्यासाठी दूरसंचार खात्याकडे स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली असल्याने या कर्मचाºयांना त्रास होणार नाही.बीएसएनएलचे वेतन सध्या वेळेवर मिळत आहे का?डिसेंबर महिन्याचे वेतन ३१ जानेवारीला होणार आहे. ते वेतन ३० जानेवारीला करण्याची मागणी आम्ही केली आहे.किती जणांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेत आणि त्याचा पुढील कामावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे?बीएसएनएलच्या राज्यातील एकूण १३ हजार ६८९ कर्मचारी व अधिकाºयांपैकी एकूण ८,५४२ जणांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यामध्ये अ गटातील ३६७, ब गटातील ९८४, क गटातील ६,५२२ व ड गटातील ६६९ जणांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात बीएसएनएलमध्ये १ फेब्रुवारीपासून केवळ ५,१४७ कर्मचारी व अधिकारी कामावर राहतील. त्यामुळे त्याचा बीएसएनएलच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांची देणी वेळेवर मिळावीत, संघटनेची भूमिका - गणेश हिंगे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 4:31 AM