Join us

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावर उदयनराजेंची सडेतोड भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 18:25 IST

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावर बंदी

मुंबई - भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर मनसेनेही इशारा दिला आहे. या पुस्तकातील मोदींच्या तुलनेवरुन आमदार शिवेंद्रराजे अन् छत्रपती संभाजीराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. 

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर छत्रपती संभाजीराजे अन् शिवेंद्रराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची भूमिका काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावर, दोन्ही राजेंनी आपली भूमिका स्पष्ट करत संजय राऊत यांना उत्तर दिलं. आता, छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज माजी खासदार भाजपा नेते उदयनराजे भोसले आपली सडेतोड भूमिका स्पष्ट करणार आहेत.   ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर उद्या मंगळवार दि 14 जानेवारी 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत,' असे ट्विट उदयनराजेंनी केले आहे. त्यामुळे, उदयनराजे उद्या नेमके काय बोलणार, संजय राऊत यांना उत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेतात. मोदींचा कारभार शिवरायांसारखा असल्याचं मला वाटतं. त्यामुळेच पुस्तकाला 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' नाव दिल्याचं गोयल म्हणाले. पुस्तक बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुस्तक मागे घेण्याचीदेखील तयारी जय भगवान गोयल दर्शवली आहे. 

टॅग्स :आज के शिवाजी नरेंद्र मोदीउदयनराजे भोसलेछत्रपती शिवाजी महाराजसंभाजी राजे छत्रपतीभाजपासंजय राऊत