Join us  

मतदारांची भूमिका निर्णायक

By admin | Published: October 13, 2014 10:43 PM

उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल व खालापूरचा काही भाग सामावलेला आहे. या दोन तालुक्यातील मतदारांची संख्या सव्वा लाखांच्या आसपास आहे.

प्रशांत शेडगे - पनवेल
उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल व खालापूरचा काही भाग सामावलेला आहे. या दोन तालुक्यातील मतदारांची संख्या सव्वा लाखांच्या आसपास आहे. त्यांची भूमिका अतिशय निर्णायक ठरणार असून तेच उरणचा भावी आमदार ठरवणार असल्याने या भागात सर्वच उमेदवारांनी अधिक लक्ष पुरवले आहे.
पूर्वी उरण तालुका हा पनवेल व अलिबाग विधानसभा मतदारसंघात विभागला गेला होता. मात्र 2क्क्8 साली झालेल्या पुनर्रचनेत उरण हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. याचे कारण म्हणजे पनवेल परिसराच्या नागरीकरणात झालेली वाढ. पर्यायाने मतदारांमध्येही वाढ झाली. उरण तालुका क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असल्याने मतदारसंघाकरिता उरणकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ओवळे, पोयंजे व कर्नाळा हे तीन सर्कल उरणला जोडण्यात आले. त्याचबरोबर खालापूरचाही काही भाग उरणमध्ये समाविष्ट करण्यात आला. 
पनवेल हा शहरी बहुल असून सिडको वसाहतीत मतदारांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे चार जिल्हा परिषदेचे गट वगळूनही पनवेलची मतदारसंख्या सव्वा चार लाख झाली आहे. कर्जत-खालापूर हा एक विधानसभा मतदारसंघ असून खालापूरचे काही गट उरणला जोडण्यात आले आहेत. तीनही तालुक्याची राजकीय पाश्र्वभूमी काहीशी वेगळी आहे. त्याचबरोबर येथील मतदारांचा ट्रेंडही वेगळा असून त्यानुसार या मतदारसंघात निवडणुकीचे निकाल लागतात. 
पनवेल उरण हा एकच मतदारसंघ पूर्वी असल्याने आता वेगळे वेगळे झाले तरी परिस्थिती फारशी बदललेली नाही. उरण शहर व तालुक्यातील मते मोठय़ा प्रमाणात विभागली जातील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील पोयंजे, कर्नाळा, ओवळे या सर्कलमधील सुमारे 75 हजार मतदान खेचण्यासाठी चुरस सुरू आहे. खालापूर पट्टय़ात सुमारे 47 हजार मतदार असून त्यांची भूमिकाही अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे. एकंदरीतच या दोन्ही तालुक्यातील सव्वा लाख मतदार अतिशय निर्णायक ठरणार असून त्यांचा कौल ज्यांच्याकडे तोच उमेदवार आमदार होईल, अशी आजची तरी परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक मतदरांबरोबरच आता खालापूर तालुक्यातील मतदारांचा कौल कुणाला मिळतो, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले 
आहे. 
 
ठाकूर फॅ क्टरही प्रभावी ठरणार
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा पनवेलबरोबर उरणमध्येही चांगला प्रभाव आहे. गव्हाण परिसर त्यांचे होम पिच आहे. त्याचबरोबर खालापूर तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचबरोबर उरण तालुका व शहरात ठाकूर यांचा जनसंपर्क असून त्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.