रोमिन छेडाची रवानगी दोन दिवसांच्या कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 09:09 AM2023-11-26T09:09:25+5:302023-11-26T09:11:37+5:30
Mumbai: ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या रोमिन छेडा याला शनिवारी दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आले. दंडाधिकारी न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली.
मुंबई : ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या रोमिन छेडा याला शनिवारी दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आले. दंडाधिकारी न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली.
कोविडकाळात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम अर्धवट असताना ते पूर्ण झाल्याचा दावा करून मुंबई महापालिकेची मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने सहा कोटींची फसवणूक केली होती. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न करताच ते पूर्ण झाल्याचे दाखवून पालिकेची फसवणूक केल्याचा ठपका कंपनीवर आहे.
आरोप फेटाळले
-अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एल.एस. पाढेन यांच्या समोर सुनावणी झाली. आरोपीच्या वतीने ज्येष्ठ कौन्सिल आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. त्यांनी तपास यंत्रणांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
- चौकशीत सहकार्य करत असतानाही अटक करण्याची गरज काय असे सांगत बनावट सह्या करून फसवणूक केल्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपाचे खंडन केले, तर या प्रकरणाचा आणखी तपास करण्यासाठी रिमांडची मागणी तपास यंत्रणांनी केली.
- याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रोमिन छेडाची आठ तास चौकशी केली तसेच नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.