मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक ३९च्या छताचा काही भाग शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कोसळला. त्या वेळी तेथे कोणीही उपस्थित नसल्याने अनुचित घटना घडली नाही.ब्रिटिशांनी १८७१मध्ये उच्च न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. १८७८मध्ये इमारतीचे काम पूर्ण झाले. १३७ वर्षे जुनी असलेली ही इमारत आजही मुंबई शहराची शान आहे. सध्या या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ३९ क्रमांकाच्या खोलीत बॉम्बे लॉ लायब्ररी आहे. या ठिकाणी अनेक वकील बसलेले असतात. मात्र ही घटना रात्री उशिरा घडल्यामुळे त्या वेळी तिथे कोणीही नव्हते.
हायकोर्टातील खोलीचे छत पडले
By admin | Published: October 18, 2015 2:40 AM