‘रोप वे’ वाहतूक व्यवस्थेचे ‘गेम चेंजर’ - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:04 AM2018-02-13T00:04:43+5:302018-02-13T00:05:07+5:30
वाहतूक व्यवस्थेसाठी जल वाहतुकीला आमची प्राथमिकता आहे. तर दुस-या क्रमाकांवर रेल्वे असून रस्ते तिसºया मार्गावर आहेत. मात्र रस्ते वाहतूकीचा सर्वात जास्त वापर झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्थेत रोप वे गेम चेंजरची भूमिका पार पडणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.
मुंबई : वाहतूक व्यवस्थेसाठी जल वाहतुकीला आमची प्राथमिकता आहे. तर दुस-या क्रमाकांवर रेल्वे असून रस्ते तिसºया मार्गावर आहेत. मात्र रस्ते वाहतूकीचा सर्वात जास्त वापर झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्थेत रोप वे गेम चेंजरची भूमिका पार पडणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केला.
इंडियन पोर्ट रेल कापोर्रेशनतर्फे अंधेरी आयोजित येथे दोन दिवसीय रोप वे विकास कार्यशाळेत नितीन गडकरी बोलत होते. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया आणि इंडियन पोर्ट रेल कापोर्रेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनुप अग्रवाल उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, ज्या शहरांमध्ये मेट्रो कार्यान्वित करणे शक्य नाही, अशा शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून रोप वे कार्यान्वित होऊ शकतो. मेट्रोचा पर कॅपिटल किलोमीटर खर्च ३५० कोटींच्या आसपास आहे तर रोपवेसाठी ५० कोटी खर्च आहे. मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया अंतर्गत लागणारी साधने बनवल्यास पर कॅपिटल किलोमीटर खर्च ३० ते ३५ कोटीपर्यंत खर्च येईल. तसेच रोप वे हा ‘प्राफिटेबल’ व्यवसाय आहे, त्यामुळे रोप वेला कोणतीही सबसिडी मिळणार नाही. तथापि यासाठी साधने बनविण्याºया कारखान्यांनी करात सूट देण्याचा निर्णय संबंधित राज्यांनी घ्यावा, अशा सूचनाही गडकरी यांनी केली.
देशात प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. यावर रोप वे दर्जेदार पर्याय ठरणार आहे. आगामी काळात रस्ते मार्ग जलमार्ग आणि रोप वे यांचा इंटिग्रेटेड प्लॅन तयार करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधितांना सूचना करण्यात येतील, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.
ठाणे-बोरीवली सर्व्हे पूर्ण
ठाणे ते बोरीवली रोप वेचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या मार्गादरम्यान कान्हेरी गुंफाजवळ एकमेव स्थानक असणार आहे. या रोपवे दरम्यान झाडे तोडली जाणार नाहीत. हा पहिला इको सेन्सिटीव्ह रोप वे असेल. तर कान्हेरी गुंफा स्थानकाजवळ वूड वॉक संकल्पनेच्या वर आधारित जंगलातून पायी सफारी करण्यास संपूर्ण मार्ग काचेने आच्छादित केले जाणार आहे, असे डॉपलमेअरचे कार्यकारी संचालक विक्रम सिंघल म्हणाले. दरम्यान, एप्रिलपासून भाऊचा धक्का - मांडवा रोरो सेवाही सुरू होणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.