‘रोप-वे’ने जा ‘गेट-वे ते एलिफंटा’, डिसेंबर २०२० पर्यंत प्रवास शक्य, मुंबई पोर्ट ट्रस्टचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:08 AM2017-12-11T05:08:04+5:302017-12-11T05:08:17+5:30

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे गेट-वे ते एलिफंटा दरम्यान ‘रोप-वे’ उभारण्यात येणार आहे. जगात समुद्रावरील सर्वाधिक लांबीचा हा रोप-वे असल्याचा दावा करण्यात येत आहे.

 'Rope-Way' can go 'get-way to Elephanta', travel by December 2020, Mumbai Port Trust initiative | ‘रोप-वे’ने जा ‘गेट-वे ते एलिफंटा’, डिसेंबर २०२० पर्यंत प्रवास शक्य, मुंबई पोर्ट ट्रस्टचा उपक्रम

‘रोप-वे’ने जा ‘गेट-वे ते एलिफंटा’, डिसेंबर २०२० पर्यंत प्रवास शक्य, मुंबई पोर्ट ट्रस्टचा उपक्रम

Next

महेश चेमटे / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे गेट-वे ते एलिफंटा दरम्यान ‘रोप-वे’ उभारण्यात येणार आहे. जगात समुद्रावरील सर्वाधिक लांबीचा हा रोप-वे असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासाठी ४१५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कंत्राट दिल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत देशी-विदेशी पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे. सागरी ‘रोप-वे’चे काम पूर्ण करण्यासाठी दोन जागतिक कंपन्या उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पर्यटकांसाठी मुंबई हे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. मुंबईच्या ‘मास्टर योजनें’तर्गत हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवत शहराचा विकास करण्यात येणार आहे. भविष्यात शहराच्या सागरी किनाºयावर पर्यटनपूरक बदल करण्यात येणार आहेत. यानुसार, शिवडी, हाजी अली आणि अन्य परिसरात प्रमुख पर्यटन केंद्र विकसित करण्यात येईल. हाजी बंदर ते एलिफंटा हे अंतर ८ किलोमीटरचे आहे. ही दोन पर्यटनस्थळे ‘रोप-वे’ने जोडण्यात येणार आहेत. ‘३ एस’ या पद्धतीने ‘रोप वे’चे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या एलिफंटाला जाण्यासाठी बोटींचा वापर केला जातो. बोटींमुळे होणारे सागरी प्रदूषण टाळण्यासाठी रोप वे हा आदर्श मार्ग ठरणार आहे. समुद्र सपाटीपासून विविध टप्प्यांत ५० ते १५० मीटरपर्यंत अंतर रोपवेमध्ये राहणार आहे.
‘बांधा-वापरा-हस्तांतरण करा’ (बीओटी) या तत्त्वावर सार्वजनिक-खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) रोप-वे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन जागतिक कंपन्या उत्सुक असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टने दिली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून नोव्हेंबरमध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हाजी अली व एलिफंटा येथील भू-परीक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. मार्च २०१८ पर्यंत परीक्षण अहवालालादेखील मान्यता मिळेल. कंत्राट दिल्यानंतर, दोन वर्षांच्या कालावधीत म्हणजेच डिसेंबर २०२० पर्यंत पर्यटकांना ‘रोप-वे’ने प्रवास करणे शक्य होईल, असा विश्वास एमपीटीने व्यक्त केला़

सागरी प्रदूषणाला आळा
पोर्ट ट्रस्टतर्फे भविष्यात विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्या प्रकल्पांपैकी एक मुंबई-एलिफंटा रोप-वे प्रकल्प आहे. सर्वाधिक क्षमतेच्या रोप-वेचा वापर या ठिकाणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सागरी प्रदूषणाला आळा बसेल. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हाजी अली व एलिफंटा येथे रोप वेचे खांब उभारण्याची जागा निश्चित होईल. कंत्राट दिल्यानंतर दोन वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.
- संजय भाटिया, चेअरमन, मुंबई पोर्ट ट्रस्ट

३एस तंत्रज्ञान

तीन रोपवर आधारित हा रोप वे दोन सपोर्ट आणि एक प्रोपूलशनसाठी गोंडोला तंत्रज्ञानावर आधारित तासाला ५ हजार प्रवासी क्षमता
७.५ ते ८.५ मीटर प्रति सेकंद असा वेग एका केबिनमध्ये २८ ते ३५ प्रवासी क्षमता रोप वे आणि केबिनचा कमीत कमी देखभाल खर्च

असा होणार रोप वे
नोव्हेंबर २०१७
‘एमओईएफ’च्या मंजुरीसाठी सल्लागारांची नेमणूक
डिसेंबर २०१७
भू आणि तांत्रिक परीक्षण
एप्रिल २०१८
परीक्षण अहवालाला ‘एमओईएफ’ची मंजुरी
जून २०१८
बीओटी तत्त्वावर आॅपरेटरची नियुक्ती
डिसेंबर २०१८
प्रकल्प उभारणीस सुरुवात

Web Title:  'Rope-Way' can go 'get-way to Elephanta', travel by December 2020, Mumbai Port Trust initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.