मुंबई : रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नरिमन पॉइंटतर्फे शुक्रवारी मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन लोअर परळ येथील फिनिक्स टॉवरमधील पार्किग लॉटमध्ये करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा:या या कॅम्पमध्ये ईसीजी, कॅन्सर, मधुमेह अशा महत्त्वाच्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.
रोटरीचे पद्माकर नांदेकर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी संस्थेतर्फे मेडिकल कॅम्प राबवण्यात येत आहे. यंदा ईसीजी, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या रोगांवरील चाचण्यांसोबत आयुव्रेदिक औषधेही मोफत देण्यात येतील. शिवाय डोळे, हाडे, कार्डियोलॉजी, रक्त तपासणी, योग चिकित्सा, दंत तपासणी, शिशु चिकित्सा, क्षयरोग, अस्थमा, ई.एन.टी. इत्यादी तपासण्याही उपलब्ध असतील.’
मेडिकल कॅम्प 12 ते 14 डिसेंबरदरम्यान सकाळी 1क् ते सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू राहणार आहे. तरी या वेळी मोतीबिंदूचे ऑपरेशन आधुनिक पद्धतीने मोफत स्वरूपात करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तरी कॅन्सर तपासणीसाठी इच्छुकांनी चिरायू बिल्डिंग, फिनिक्स टॉवरसमोर, लोअर परळ या ठिकाणी नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.