Join us

हाताला काम मिळणार, रोटरी २०० तरुणांना रोजगार देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 4:25 AM

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४१ने वार्षिक रोटरी रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी,

मुंबई : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४१ने वार्षिक रोटरी रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी, ६ आॅक्टोबरला सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत केले आहे. अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगरमध्ये वालिया महाविद्यालयात हा मेळावा पार पडेल.

या मेळाव्यात यंदा २ हजारांहून अधिक पदे असून, किमान २०० पदे रोटरी क्लब आॅफ बॉम्बे सीकोस्ट भरणार असल्याचे रोटरीयन विकास उपाध्याय यांनी सांगितले. उपाध्याय म्हणाले की, या वेळी एका दिवसात सुमारे ३.५ कोटी रुपयांचे रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कुशल भारत उपक्रमाला चालना मिळेल. रिक्रूटर कंपन्या आणि उमेदवारांसाठी या मेळाव्यात विनामूल्य प्रवेश आहेत. मेळाव्यात बँकिंग, आर्थिक सेवा, विमा, भांडवल बाजारपेठा, एफएमसीजी, रिटेल, टेलिकॉम, हाउसिंग, क्विक सर्व्हिस, रेस्टराँ, फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांमधील रोजगार संधी उपलब्ध असतील. दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसोबत आयटीआय, डीएमई, बीए, बीकॉम, बीएससी, बीई, एमबीए उत्तीर्ण उमेदवारांना या वेळी अर्ज करता येतील. सर्व उमेदवारांसोबत दिव्यांग उमेदवारांना डिजिटल भारत उपक्रमांतर्गत आॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले आहे. या मेळाव्याला हजारो तरूण सहभागी होती, अशी अपेक्षा आहे़

टॅग्स :नोकरीरोटरी क्लबमुंबई