मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील सहाही लोकसभा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार विजयी झाले; आणि मुंबईत तुफान जल्लोष सुरू झाला. याच काळात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या म्हणजेच फिल्डसह सोशल मीडियावर कार्यकर्त्यांसह समर्थकांनी तुफान फटकेबाजी केली. तत्पूर्वी गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून मतमोजणीच्या फेºया होईपर्यंत, कल समजेपर्यंत आणि अंतिम आकडेवारी हाती येईपर्यंत मध्यरात्र उलटली होती. उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई या तिन्ही लोकसभा मतदारसंघाचे अंतिम निकाल हाती येईपर्यंत मध्यरात्र होत आल्याने शेवटपर्यंत उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होती.
मुंबई शहरातील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघांचे निकाल सायंकाळसह रात्रीपर्यंत हाती आले होते. शिवसेनेचे अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे यांचा येथे विजय झाला होता. तर पूर्व उपनगरातील उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मनोज कोटक येथे विजयी झाले होते. दुपारपर्यंत येथील चित्र जवळजवळ स्पष्ट झाले होते; आणि विजयाचा जल्लोषही सुरू झाला होता. विशेष म्हणजे निकालाची अंतिम आकडेवारीही सायंकाळपर्यंत जवळजवळ हाती आली होती. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्यासह त्यांच्या टीमने उत्तम नियोजन केले होते.मात्र पश्चिम उपनगरातील उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या तिन्ही लोकसभा मतदारसंघांची आकडेवारी हाती येण्यास रात्री विलंब झाला.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची अंतिम आकडेवारी गुरुवारी रात्री १० वाजता हाती आली. मात्र भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडे विजयाचा कल झुकल्याने सेलिब्रेशन सायंकाळी सुरू झाले होते. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांचा विचार करता येथील अंतिम आकडेवारी शुक्रवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास हाती आली. मात्र येथेही विजयाचा कल शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांच्याकडे झुकला होता.उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघाच्या निकालाची अंतिम आकडेवारी हाती येण्यास गुरुवारचे रात्रीचे १२ वाजले होते. मात्र या मतदार संघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विजयाचा कल तिसºया ते पाचव्या फेरीपर्यंत त्यांच्याकडे झुकला होता. परिणामी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रावरच जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.दुपारनंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेलाएकंदर गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत बहुतांशी उमेदवारांचे कल समजले होते.च्विजयी उमेदवारांचे कल समजल्याने केंद्राबाहेर समर्थकांनी गर्दी केली होती. तेवढीच गर्दी विजयी उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर करण्यात आली होती. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकमेकांचे तोंड गोड करीत आतशबाजीही केली.च्कल समजणे महत्त्वाचे असले तरी मताधिक्यही तेवढेच महत्त्वाचे होते. विशेषत: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचा मताधिक्य फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा होता.च्कारण २०१४ च्या लोकसभेला शेट्टी यांचे मताधिक्य सुमारे चार लाख होते. परिणामी, अंतिम निकालात हाच आकडा कायम राहणार का? याचे कुतूहल सर्वांनाच होते. त्यामुळे अंतिम निकालापर्यंत धाकधूक कायम असल्याचे चित्र होते.