- स्नेहा मोरे मुंबई : दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या मोनोच्या मार्गामुळे वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाल्याचे चित्र होते. मात्र, सध्या तरी या मार्गावर ‘जॉयराइड’साठी मुंबईकर आणि पर्यटकांची रीघ आहे. कामगारांचा परिसर म्हणून ओळख असणाऱ्या मात्र, गेल्या काही वर्षांत कॉर्पोरेट सेक्टर म्हणून उदयास आलेल्या लोअर परळ आणि संत गाडगे महाराज चौक परिसरातील नोकरदारांसाठी हा मोनोचा मार्ग उपयुक्त आहे. मात्र, या मार्गाच्या वाढत्या दरांमुळे नोकरदारांमध्ये कमालीची नाराजी दिसून येते आहे.मोनोच्या दुसºया टप्प्यातील दादर, नायगाव, आंबेडकरनगर, लोअर परळ, वडाळा ब्रिज या स्थानकांवरही प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद लाभलेला दिसून येतो. लोअर परळ येथील उड्डाणपूल बंद झाल्याने दिवसागणिक येथे प्रवाशांचा ताण वाढत गेला. मात्र, आता दुसºया टप्प्यातील मोनोच्या मार्गामुळे दादर, चेंबूरच्या कनेक्टिव्हिटीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाल्याने परिसरातील नोकरदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, मोनोच्या दरात वाढ झाल्यामुळे वापर वाढण्यासाठी दर कमी होण्याची मागणी येथील स्थानिक आणि नोकरदार आग्रहाने करीत आहेत.मोनोचा पहिला टप्पा हा संपूर्णत: तोट्यात होता. त्यामुळे प्रशासनाचेही दुसºया टप्प्यातील मार्गाकडे लक्ष लागून राहिले होते. दुसºया टप्प्यातील मार्गावरची अॅक्सेसिबिलिटी वाढली असल्याचे गेल्या आठवड्यातील वाहतुकीमुळे दिसून आले आहे. मात्र, अजूनही मुंबईकर मोनोच्या या पट्ट्याकडे जॉयराइड म्हणून पाहात आहेत. सध्या गाड्यांच्या अपुºया संख्येमुळे तूर्तास दोन गाड्यांमध्ये २० मिनिटांचे अंतर असेल. याविषयी लोअर परळ येथील खासगी कार्यालयात काम करणाºया प्रतीक्षा गव्हाणे यांनी सांगितले की, यापूर्वी चेंबूर जाण्यासाठी लोकल बदलून प्रवास करावा लागत होता. मात्र, आता या मोनोमुळे काही दिवस थेट चेंबूरला जाण्याचा प्रवास सुुरू आहे. मात्र, रिटर्न तिकीट नसल्यामुळे आणि तिकिटाचा दरही जास्त असल्याने सामान्यांच्या खिशाला परवडत नाही, याचा विचार होणे गरजेचे आहे. शेअर टॅक्सीचालक राघव म्हणाले की, मोनोमुळे शेअर टॅक्सीवाल्यांना काहीसा फटका बसला आहे.
मार्ग फायद्याचा, पण तिकीट महाग; नोकरदारांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 1:19 AM