ग्रीसवरून रो पॅक्स सेवेचे जहाज २८ जानेवारीपर्यंत येणार मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:05 AM2020-01-06T06:05:38+5:302020-01-06T06:05:44+5:30

मांडवा या ठिकाणी जाण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या रो पॅक्स, रोल आॅन रोल आउट (रो-रो ) सेवेसाठी आवश्यक असलेले जहाज ग्रीसवरून मुंबईला २८ जानेवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे.

Row Pax service ship from Greece will arrive in Mumbai by January 1st | ग्रीसवरून रो पॅक्स सेवेचे जहाज २८ जानेवारीपर्यंत येणार मुंबईत

ग्रीसवरून रो पॅक्स सेवेचे जहाज २८ जानेवारीपर्यंत येणार मुंबईत

Next

मुंबई : मुंबईतून जलमार्गाने आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसह अलिबाग, मांडवा या ठिकाणी जाण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या रो पॅक्स, रोल आॅन रोल आउट (रो-रो ) सेवेसाठी आवश्यक असलेले जहाज ग्रीसवरून मुंबईला २८ जानेवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे. हे जहाज मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर मार्चपूर्वी ही सेवा सुरू करण्यात येईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले.
ग्रीक शिपिंगच्या माहितीनुसार, दाखल होणाºया या जहाजाची क्षमता एका वेळी एक हजार प्रवासी व २०० वाहनांची आहे. खराब हवामान असल्यास या जहाजाद्वारे एका
वेळी ५०० प्रवासी प्रवास करू शकतील, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली. या सेवेमुळे मुंबई ते अलिबाग प्रवासाला सध्याच्या लागणाºया वेळेत बचत होईल, वाहतूककोंडी कमी होईल व इंधन बचत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. रो पॅक्स सेवेसाठी आवश्यक असणाºया पायाभूत सुविधा मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पूर्ण करण्यात आल्या असून, जहाजाची प्रतीक्षा केली जात आहे. जहाज आल्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल व ही सेवा मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल.

Web Title: Row Pax service ship from Greece will arrive in Mumbai by January 1st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.