रॉय हे स्वत:च्या अटीवर जगले... मृत्यूही तसाच निवडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:35 AM2018-05-19T02:35:00+5:302018-05-19T02:35:00+5:30

आझाद मैदान येथील प्रेरणा हॉलमध्ये आयोजिलेल्या आयपीएस हिमांशू रॉय याच्या शोकसभेला त्यांचे नातेवाईक, पोलीस अधिकारी, तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थिती लावली. रॉय यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे मेहुणे अनिष त्रिपाठी यांनी सांगितले, ‘काही जण म्हणतात रॉय यांनी आत्महत्या केली, मात्र आमचा विश्वास आहे की त्याने स्वत:च्या अटींवर जीवन जगले आणि त्याचा मृत्यूही तसाच निवडला.’

Roy lives on his own terms ... he has also chosen the same death | रॉय हे स्वत:च्या अटीवर जगले... मृत्यूही तसाच निवडला

रॉय हे स्वत:च्या अटीवर जगले... मृत्यूही तसाच निवडला

googlenewsNext

मुंबई : आझाद मैदान येथील प्रेरणा हॉलमध्ये आयोजिलेल्या आयपीएस हिमांशू रॉय याच्या शोकसभेला त्यांचे नातेवाईक, पोलीस अधिकारी, तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थिती लावली. रॉय यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे मेहुणे अनिष त्रिपाठी यांनी सांगितले, ‘काही जण म्हणतात रॉय यांनी आत्महत्या केली, मात्र आमचा विश्वास आहे की त्याने स्वत:च्या अटींवर जीवन जगले आणि त्याचा मृत्यूही तसाच निवडला.’
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रॉय यांच्या पत्नी भावना आणि नातेवाईक अमिष, अनिष त्रिपाठी, बहीण नेहल व्यास तसेच जवळच्या नातेवाइकांसह पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विवेक फणसाळकर यांच्यासह पोलीस दलातील आजी-माजी अधिकारी उपस्थित होते.
अनिश त्रिपाठी यांनी, रॉय हे आपल्याला मोठ्या भावाप्रमाणे होते. रक्ताचे नाते नसले तरी त्याच्यासोबत एक वेगळीच घट्ट नाळ जोडली होती. बहिणीसोबत विवाह झाल्यानंतर त्याने आम्हाला नेहमी त्याच्याच कुटुंबाप्रमाणे वागणूक दिल्याचे सांगितले. कुठल्याही कठीण परिस्थितीला कसे तोंड द्यायची, याची क्षमता रॉयमध्ये होती. त्यांच्या नाशिकमधील आठवणी सांगताना अनिश म्हणाले, कामावरून घरी जाताना एका अपघातग्रस्त ठिकाणी एक महिला मलब्याखाली फसल्याचे रॉय यांनी पाहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला तेथून बाहेर काढले. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ती महिला तेव्हापासून दरवर्षी रॉय यांना राखी बांधण्यासाठी यायची.
रॉय यांची चुलत बहीण दिव्या मेहता म्हणाल्या, मी १५ वर्षांची असताना रॉयचा जन्म झाला. मला भाऊ नाही. पण रॉयच्या रूपात मला भाऊ मिळाला. माझ्यासोबत त्याला सांताक्रुझ विमानतळावर जाण्याचा प्रवास आवडत असे. कारण त्याला विमानाचे टेक आॅफ आणि लॅण्डिंग घेणे आवडत होते. तसेच प्राण्यांवरही त्याचा जीव होता.
एसीबीचे विवेक फणसाळकर यांनी रॉय हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांच्या परिवारासोबत आपले घनिष्ठ संबंध होते. मुंबईत ते सहआयुक्त (गुन्हे) असताना माझी वाहतूक सहआयुक्तपदावर नेमणूक झाली. तेव्हा वेळोवेळी आमची भेट होत असे. ते नेहमीच मार्गदर्शन करत असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Roy lives on his own terms ... he has also chosen the same death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.