Join us

गोळीबारानंतर RPF कॉन्स्टेबलची चालत्या ट्रेनमधून उडी! जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील थराराच्या ६ मोठ्या अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 9:10 AM

जयपूर एक्सप्रेस ट्रेनच्या (१२९५६) बी-५ बोगीमध्ये गोळीबार झाला. ट्रेन जयपूरहून मुंबईला जात होती. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन असे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

जयपूर- मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवासी आहेत. आरपीएफच्या कॉनस्टेबल चेतन याने सगळ्यांवर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान घडली. मीरा रोड बोरिवली दरम्यान जीआरपी मुंबईच्या जवानांनी या कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले.

गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात आरपीएफच्या एएसआयसह चार जणांचा मृत्यू झाला.

१- जयपूर एक्सप्रेस ट्रेनच्या (१२९५६) बी-५ बोगीमध्ये गोळीबार झाला. ट्रेन जयपूरहून मुंबईला जात होती. 

२- पालघर स्थानकापासून काही अंतरावर ट्रेन सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे ५.२३ वाजता वापी ते बोरिवलीमीरा रोड स्थानकादरम्यान आरपीएफ कॉन्स्टेबलने अचानक गोळीबार केला.

३- या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक आरपीएफ एएसआय टिका राम आणि तीन प्रवासी असल्याची माहिती आहे. टिका राम हे एस्कॉर्ट प्रभारी होते.

४- गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन असल्याचे सांगण्यात येत आहे. चेतन एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता. गोळीबार केल्यानंतर त्याने ट्रेनमधून उडी मारली. मात्र, मीरा रोड बोरिवलीजवळ त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

५- गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आरपीएफने तपास सुरू केला आहे.

६- पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. आरोपींनी आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या आणि दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली. आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :गोळीबारपोलिसरेल्वे