Join us

आरपीएफ करतात तिकीट तपासणीस

By admin | Published: October 13, 2016 3:36 AM

विदर्भ एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे तिकीटची मागणी केल्याचा जाब विचाराताच त्यांना दमदाटी करून तिकीट दाखवा नाहीतर १०० रु पये द्या, अशी मागणी करणाऱ्या आरपीएफ जवानांवर

कसारा : विदर्भ एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे तिकीटची मागणी केल्याचा जाब विचाराताच त्यांना दमदाटी करून तिकीट दाखवा नाहीतर १०० रु पये द्या, अशी मागणी करणाऱ्या आरपीएफ जवानांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सोमवारी रात्री विदर्भ एक्सप्रेसने कल्याणहून नाशिककडे जाण्यासाठी एक ठाकूर नामक प्रवासी प्रवास करित होते.धावती गाडी पकडल्याने ते एस १० या डब्यात चढले. त्यानंतर कल्याण सोडल्यावर पेट्रोलींग करणाऱ्या आरपीएफ जवानांनी प्रवाशांना दमदाटी करणे सुरू केले. तिकीट दाखवा नाहीतर १०० रु पये द्या, अशी मागणी केली. जवानांच्या उद्धट वर्तनावर आक्षेप घेऊन ठाकूर यांनी तुम्हाला तिकीट तपासणीचा काय अधिकार, टीसी त्यांचे काम करतील, असे सुनावले असता आरपीएफ जवान संतापले.त्यानी ठाकुर यांना धमकी देऊन काढता पाय घेतला.दरम्यान सुरक्षेसाठी असलेल्या जवानांपासून प्रवाशी असुरिक्षत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, गाडीत बेकायदेशीरपणे धंदा करणाऱ्या सुमारे १५ ते २० फेरीवाल्यांवर हे जवान कारवाई न करता त्यांच्याकडून प्रत्येकी ५० रुपये घेऊन त्यांना संरक्षण देतात, असा प्रवाशांचा आरोप आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात ठोस कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जात आहे. (वार्ताहर)