'गो कोरोना गो'नंतर रामदास आठवलेंची नवी कविता, 'एक दिन हम बजा देंगे करोना के बारा'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 06:07 PM2020-03-13T18:07:17+5:302020-03-13T18:50:41+5:30
या कवितेतून ते, एक दिवस आम्ही कोरोनाचे बारा वजवू, असे सांगत आहेत.
मुंबई - गो करोना गो... या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा करोनावर कविता केली आहे. या कवितेतून ते, एक दिवस आम्ही कोरोनाचे बारा वजवू, असे सांगत आहेत.
आता महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण सापडत आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाची लागण होऊ नये यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यावी यासंदर्भात सोशल मीडियावरून जनजागृतीही केली जात आहे.
काय आहे कविता –
करोना गो ये मैने दिया था नारा।
इसलिए जाग गया था भारत सारा।।
करोना जैसे चमक रहा है १०२ देशो मै तारा।
एक दिन हम बजा देंगे करोना के बारा।।
यावेळी रामदास आठवले यांनी कोरोनाची लागण होऊ नाये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 17 रुग्ण आढळले आहेत. यापैकी पुण्यात - 10, मुंबईत - 4 तर नागपूरात - 3 रुग्ण आढळले आहेत
काही दिवसांपूर्वीच आठवले यांचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते काही परदेशी नागरिकंसमवेत ' गो करोना गो... गो करोना गो....' अशी घोषणा देताना दिसत होते. यासंदर्भात आठवले यांना विचारले असता, मी गो कोरोना गो.. म्हटल्यामुळेच कोरोना जास्तप्रमाणात महाराष्ट्रात आला नाही, असे ते म्हणाले होते.
आठवलेंच्या या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते. तसेच, केंद्रीयमंत्र्यांना हे शोभते का, असा सवालही नेटीझन्सनी केला होता. मात्र, जोपर्यं कोरोना जात नाही, तोपर्यंत मी गो कोरोना... म्हणतच राहणार, असे आठवलेंनी म्हटले होते