ठाणो : रिपाइं एकतावादी राज्यभरात सुमारे 20 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली.
रिपाइं एकतावादीच्या राज्य कार्यकारिणीची विशेष बैठक शनिवारी पक्षाच्या मुख्य कार्यालयात झाली. त्या वेळी राज्यातील मुख्य अशा 2क् जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला. यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, ठाणो जिल्ह्यात 8, मुंबईमध्ये 2, उत्तर महाराष्ट्रात 3, मराठवाडय़ात 3, विदर्भात 2, कोकणात 1 आणि पश्चिम महाराष्ट्रात 1 अशा जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये फुले-आंबेडकविचारधारेचा प्रबळ उमेदवार उभा असेल, एकतावादी त्या उमेदवारास बिनशर्थ पाठिंबा देईल.