राज ठाकरेंसोबत युती करणं परवडणारं नाही; भाजपाला देशपातळीवर नुकसान होऊ शकतं- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 04:37 PM2022-09-02T16:37:50+5:302022-09-02T16:38:35+5:30

अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

RPI president Ramdas Athawale said that if MNS is taken along, it can cause damage at the national level. | राज ठाकरेंसोबत युती करणं परवडणारं नाही; भाजपाला देशपातळीवर नुकसान होऊ शकतं- रामदास आठवले

राज ठाकरेंसोबत युती करणं परवडणारं नाही; भाजपाला देशपातळीवर नुकसान होऊ शकतं- रामदास आठवले

Next

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान भाजपा आणि मनसे युतीचा नारळ फुटणार असल्याची चिन्हं दिसून येत आहे. 

अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा आणि मनसेकडून अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मनसेला सोबत घेतलं तर देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतल्या इतर लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारं नाही, असं रामदास आठवलेंनी सांगितले. राज ठाकरे चांगले नेते आहेत. सभा होतात. पण त्यांना मतं मिळत नाहीत, असंही रामदास आठवलेंनी यावेळी सांगितलं. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. लालबागचा गणपती, सिद्धिविनायक आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडील गणरायाचे दर्शन ते घेतील. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शहा मार्गदर्शन करतील, अशीही शक्यता आहे. काही ना काही राजकीय बैठक होईलच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेही अमित शहांना भेटणार-

अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा आणि मनसेकडून अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: RPI president Ramdas Athawale said that if MNS is taken along, it can cause damage at the national level.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.