Join us

सीएसएमटी येथे उभारणार ‘आरआरई’ यंत्रणा

By admin | Published: June 13, 2017 2:34 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक्स्प्रेस ट्रेनच्या सुविधेसाठी रुट रिले इंटरलॉकिंग (आरआरई) यंत्रणा इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक्स्प्रेस ट्रेनच्या सुविधेसाठी रुट रिले इंटरलॉकिंग (आरआरई) यंत्रणा इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांच्या हस्ते सोमवारी आरआरई यंत्रणा इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी मरेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.आर.आर.ई. प्रणालीसह सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ या फलाटांचा विस्तार आणि यार्ड रिमॉडेलिंगदेखील करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी ६० कोटी ४७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. आरआरई प्रणालीमुळे सीएसएमटी स्थानकांमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या लोकल अधिक वक्तशीरपणाने चालू शकतील. त्याचबरोबर चार फलाटांच्या विस्तारीकरणानंतर या फलाटांवर २४ डब्यांच्या एक्स्प्रेसही येणे शक्य आहे. यामुळे अन्य फलाटावरील एक्स्प्रेसचा भार कमी होईल. सध्या फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ येथे पंधरा-सोळा डब्यांच्या ट्रेन येत आहेत. सीएसएमटी येथे सध्या अस्तित्वात असलेले यार्ड रिमॉडेलिंगमुळे अनावश्यक जागेच्या ठिकाणी एक्स्प्रेससंबंधी सफाई यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.