रोहयोची १० हजार कोटींची योजना
By admin | Published: October 4, 2016 05:16 AM2016-10-04T05:16:15+5:302016-10-04T05:16:15+5:30
‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने’साठीचा खर्च १० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असून, या अंतर्गत ११ कलमी कामे हाती
मुंबई : ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने’साठीचा खर्च १० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असून, या अंतर्गत ११ कलमी कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे रोहयोमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना पुस्तिकेचे प्रकाशन आणि फ्लेक्सचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या वेळी रावल म्हणाले, ‘या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे व्हावीत, याकरिता रोजगार हमी योजना विभागाने ही योजना तयार केली
आहे.’
या योजनेंतर्गतचा खर्च सुमारे १० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. प्रमुख ११ कामे प्रत्येकी १,११,१११ या प्रमाणे घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेमुळे ग्रामीण भाग दुष्काळमुक्त होऊन शेतकरी समृद्ध होईल आणि रोजगार हमी योजनेतून ग्रामीण महाराष्ट्रात आम्ही मागील काळापेक्षा अधिक निधी खर्च करून विकास करून दाखवू, असा विश्वास जयकुमार रावल यांनी या वेळी व्यक्त
केला. नरेगाच्या माध्यमातून समृद्धी आली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजने’बाबत रोहयोमंत्री रावल, रोहयो सचिव डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे अभिनंदन केले. (विशेष प्रतिनिधी)