Join us

२४ उत्कृष्ट स्टार्टअप्सना १५ लाखांपर्यंतचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 2:31 AM

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यां​​​ची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत २४ उत्कृष्ट स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून या स्टार्टअप्सची नावीन्यपूर्ण उत्पादने आणि त्यांच्या सेवांचा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश देण्यात येतील, अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली.कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. या स्पर्धेत देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. त्यातील उत्कृष्ट १०० स्टार्टअप्सनी मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर सादरीकरण केले. त्यातील २४ कल्पनांचा वापर शासनाच्या विविध विभागांमधील कामकाजासाठी करण्यात येणार आहे. आयटीआयच्या माध्यमातून स्टार्टअप पार्कची स्थापना करण्याची घोषणाही मलिक यांनी केली.