गेनबिटकॉईन पोंझी स्कीमद्वारे २ हजार कोटींची फसवणूक, रणजीत पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:51 AM2018-03-15T04:51:10+5:302018-03-15T04:51:10+5:30

गेनबिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पॉँझी स्कीम सुरू करून गुंतवणूकदारांची २ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

Rs 2,000 crore cheating through GenBitowin Ponzi scheme, Ranjeet Patil's information | गेनबिटकॉईन पोंझी स्कीमद्वारे २ हजार कोटींची फसवणूक, रणजीत पाटील यांची माहिती

गेनबिटकॉईन पोंझी स्कीमद्वारे २ हजार कोटींची फसवणूक, रणजीत पाटील यांची माहिती

googlenewsNext

मुंबई : गेनबिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पॉँझी स्कीम सुरू करून गुंतवणूकदारांची २ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
या प्रकरणाची चौकशी सध्या सायबर क्राइम सेलमार्फत सुरू आहे. मात्र घोटाळ्याची मोठी व्याप्ती लक्षात घेता ईडीकडून तपासाचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदस्य राहुल कुल यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना कसा गंडा घालण्यात आला याची धक्कादायक माहिती कुल यांनी या वेळी दिली.
गेनबिटकॉईन डॉट कॉमच्या आधारे अमित भारद्वाज व त्याच्या प्रतिनिधींनी पुणे, मुंबई, नांदेड, कोल्हापूरसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याचे ते म्हणाले.
डिजिटल करन्सीचा वापर करून पुणे आणि नांदेड येथील गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या पॉन्झी स्कीम सुरू करून, नवी दिल्ली येथील अमित एमकुमार भारद्वाज, नांदेड येथील अमोलकुमार थोंबाळे, बालाजी पांचाळ, राजू मोतेवार व इतरांनी नांदेड येथील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर थोंबाळे याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा तपास सुरू आहे. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य आशिष शेलार, शंभुराज देसाई यांनी सहभाग घेतला.
रिझर्व्ह बँकेने नागरिकांनी अशा स्कीममध्ये गुंतवणूक न करण्यासंबंधी परिपत्रक काढले आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ईडीकडे तपास देण्याचा विचार केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
>मुख्य आरोपी परदेशात
मुख्य आरोपी अमित भारद्वाज हा परदेशात राहत असून त्याच्याविरुद्ध लूक आऊट नोटीसची कार्यवाही करण्यात येत आहे. सिंगापूर येथे बसून अमित भारद्वाज हा नियंत्रण करीत होता, असे गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले.
>पुण्यातील
खाती सील
पुण्यातील प्रकरणामध्ये संबंधितांचे खाते सील करण्यात आले असून, ५ कोटी ९६ लाख रोख आणि ई व्हॅलेटमधून
२ कोटी ४२ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Rs 2,000 crore cheating through GenBitowin Ponzi scheme, Ranjeet Patil's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.