‘मेट्रो’साठी २१०० कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 03:43 AM2016-03-22T03:43:32+5:302016-03-22T03:43:32+5:30
मेट्रो रेल्वेच्या विविध प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नव्या आर्थिक वर्षात तब्बल २१५१.७५ कोटींची तरतूद केली आहे
मुंबई : महानगरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या विविध प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नव्या आर्थिक वर्षात तब्बल २१५१.७५ कोटींची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महानगरातील दळणवळणाबाबतच्या विविध प्रस्ताव व योजनांच्या अंमलबजावणीसाठी २०१६-१७ या वर्षात ६ हजार ६४७.६७ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला.
यामध्ये मेट्रो मार्गाबरोबरच प्रामुख्याने शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू, मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-दोन, उड्डाणपूल, खाडी पूल, रस्त्यांचे जाळे उभारणे, मोनोरेलचा दुसरा टप्पा आणि वांद्रे-कुर्ला संकुलाची सुधारणा आदी प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे.
एमएमआरडीएने अर्थसंकल्पात दहिसर ते डी.एन.नगर आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या दोन मेट्रो मार्गासाठी प्रत्येकी ५०० कोटींची तरतूद केली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन भुयारी मार्गांसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ३४१.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतूसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प दोनसाठी ७१८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलासाठी १७१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सांताक्रुझ-चेंबूर जोडरत्याचा विस्तार छत्रपती शिवाजी टर्मिनस रोड कुर्ला व वाकोला पुलापर्यंत करण्यासह वांद्रे-कुर्ला संकुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत उन्नत रस्ता बांधण्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय छेडानगर येथे दोन उड्डाणपूल आणि एक उन्नत रस्ता बांधून तेथील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
> प्रकल्पांसाठी व्याजदर केले कमी
एमएमआरडीएच्या राखीव निधीतून महापालिका, नगरपरिषदा आणि
इतर संस्थांना विविध पायाभूत सुविधा प्रकल्प व वाणिज्यिक प्रकल्प राबविण्यासाठी व्याजदर कमी करण्यात आले आहेत. या नवीन व्याजदरांमुळे अधिकाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले जातील, अशी आशा प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.
2016 सालचा एमएमआरडीएचा अर्थसंकल्प वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रशासकीय कार्यालयात मांडण्यात आला. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, महापौर स्नेहल अंबेकर, विधानपरिषद सदस्य प्रकाश बिनसाळे, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस.मदान, अतिरिक्त आयुक्त संजय सेठी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे या वेळी उपस्थित होते.एमएमआरडीएने १२.१६ कोटींवर पाणी सोडले
वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमासाठी एमआयडीसीने १२.१६ कोटी रुपये भाडे देण्यास नकार दिला असतानाच, सोमवारी एमएमआरडीएच्या बैठकीत हे भाडे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. प्रादेशिक स्तरावर जलस्रोतांचा विकास साधण्यासाठी
८७.५२ कोटी
पुनर्वसन आणि पुनर्वसाहत सुविधेसाठी ५९.७१ कोटी
मुंबई महानगर
प्रदेशाच्या बाह्य क्षेत्रातील रस्ते सुधारण्यासाठी ४१.९७ कोटी
मिठी नदी विकास व संरक्षणासाठी २५ कोटी
125
कोटी
डॉ.आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकासाठी
1000
कोटी शिवडी- न्हावा शेवा जलसेतूसाठी70 कोटी वडाळा ट्रक टर्मिनलसाठी 70 कोटी वडाळा ट्रक टर्मिनलसाठी
341.50
कोटी मोनो रेल प्रकल्पासाठी 171
कोटी वांद्रे-कुर्ला संकुल
व हायब्रीड बस खरेदीसाठी 82
कोटी मुंबई नागरी पायाभूत सुविधांसाठी827
कोटी विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधांसाठी718
कोटी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प दोनसाठी 2151.75
कोटी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी