एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, २७० कोटी रुपये मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 08:51 PM2020-06-23T20:51:29+5:302020-06-23T20:55:03+5:30
राज्य सरकारने एसटी महामंडळातील विविध सवलतींच्या प्रतीपुर्तीच्या थकबाकी रकमेतून एसटी महामंडळाला २७० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पगार जून महिना संपत आला, तरी देखील मिळाला नाही. मात्र बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगाराचा तिढा सुटणार आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळातील विविध सवलतींच्या प्रतीपुर्तीच्या थकबाकी रकमेतून एसटी महामंडळाला २७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रकमेतून एसटी कर्मचा-यांचा पगार देण्यात येणार आहे.
एसटी महामंडळातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. एसटी बससेवा व मालवाहतुक काही प्रमाणात सुरू झालेली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन २३ जून उलटून देखील वेतन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचा-यांच्या दैनंदिन मुलभूत गरजा भागविण्यासाठी वेतनाची अत्यंत आवश्यकता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेस वेतन दिले जाते.
मे महिन्याचा पगार अद्याप झाला नसल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात पगार होणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
- एसटी महामंडळाला २७० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे लवकरच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन होणार आहे. - शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ
- महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने शिवशाही, ब्रिक्स यासह कोणत्याही खासगी कंत्राटदारांची बिले अदा न करता २७० कोटी रूपयांमधून केवळ एसटी कर्मचा-यांचे वेतन करण्याची मागणी केली होती. ती प्रशासनाने मान्य केल्याने बुधवारी कर्मचा-यांचे पगार होतील.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
आणखी बातम्या...
वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका
दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक
हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'
"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!