एसटीला प्रवाशांकडून ३७ कोटींची ‘ओवाळणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:49 AM2017-08-14T05:49:14+5:302017-08-14T05:49:17+5:30
राज्य मार्ग परिवहन मंडळाने रक्षाबंधननिमित्त विभाग नियंत्रकांना जादा एसटी फेºया सोडण्याचे आदेश दिले होते
मुंबई : राज्य मार्ग परिवहन मंडळाने रक्षाबंधननिमित्त विभाग नियंत्रकांना जादा एसटी फेºया सोडण्याचे आदेश दिले होते. ७ व ८ आॅगस्ट या दिवशी चालविलेल्या जादा फेºयांमुळे एसटीला तब्बल ३७ कोटी २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे रक्षाबंधननिमित्त प्रवाशांनी एसटी महामंडळाला कोट्यवधींची ओवाळणी दिली आहे.
रक्षाबंधन सणाला जोडून आलेला रविवार यामुळे वाहतुकीसाठी राज्यभर एसटीला प्रवाशांनी प्रथम पसंती दिली. एसटी महामंडळाने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा फेºया सोडण्याचे आदेश दिले होते. याबाबतचे आदेश मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आले होते. महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागातून २ कोटी ८५ लाख एवढे, तर तर नाशिक विभागातून २ कोटी ६० लाखांचे उत्पन्न मिळाले. राज्यभरातील ३१ विभागांतून एकूण ३७ कोटी २५ लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे एसटीतील सूत्रांनी स्पष्ट केले.