स्टेट बँक खात्यातील ४० लाख रुपये लंपास
By admin | Published: May 21, 2015 02:19 AM2015-05-21T02:19:05+5:302015-05-21T02:19:05+5:30
सरकारी खात्यातील तब्बल ४० लाख ९ हजार ६२० रुपये बनावट चेक्सचा वापर करुन, आरटीजीएस बॅन्कींग सिस्टिमद्वारे लंपास झाल्याने जिल्ह्यातील बॅन्कींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जयंत धुळप - अलिबाग
जिल्ह्यात एटीम कार्डचा पासवर्ड चलाखीने मिळवून बॅन्क खातेदाराच्या खात्यातील पैसे लंपास करण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. बालाजी ट्रेडींग आणि जी.के.इन्फोटेक या दोन बँक खातेदारांनी, येथील स्टेट बॅन्क आॅफ इंडीया मधील सहाय्यक जिल्हा निबंधकाच्या सरकारी खात्यातील तब्बल ४० लाख ९ हजार ६२० रुपये बनावट चेक्सचा वापर करुन, आरटीजीएस बॅन्कींग सिस्टिमद्वारे लंपास झाल्याने जिल्ह्यातील बॅन्कींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या वटलेल्या या दोन्ही बनावट धनादेशांची एकूण रक्कम ४०लाख०९ हजार ६२० रुपये आहे. दरम्यान १८ मे २०१५ रोजी २५ लाख ८० हजार ०२९ रुपयांचा तिसरा बनावट धनादेश नं. ०६९०४८ हा अलिबाग मधील सेंट्रल बँक इंडियामध्ये जमा केला. परंतू य्तो वटला नाही, आणि तिसऱ्या चेक द्वारे फसवणूक यशस्वी होवू शकली नाही. या दोन्ही खातेधारकांनी सहाय्यक जिल्हा निबंधक या स्टेट बँक आॅफ इंडिया अलिबाग शाखेतील खातेधारकाच्या खात्याचा बनावट चेक बनवून, त्यावर खोटा सरकारी शिक्का व सही करुन बनावट धनादेश वटवण्याकरिता टाकून बँकेची व सहाय्यक जिल्हा निबंधक यांची फसवणूक केली. म्हणून या दोन खातेदारांविरुद्ध येथील स्टेट बॅन्क आॅफ इंडीयाचे शाखाधिकारी मिलींद हर्डीकर यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादिनूसार भा.द.वि.कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ आणि ४८९ (अ)
अन्वये पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
असा केला गुन्हा
च्गुजराथ राज्यातील भरुच
येथील सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेतील खातेधारक जि.के.इन्फोटेक व गुजराथ मधीलच अंकलेश्वर येथील
बँक आॅफ बडोदा शाखेतील खातेधारक बालाजी ट्रेडींग, या दोन खातेदारांंनी भारतीय स्टेट बँकेच्या अलिबाग शाखेत असलेल्या, जिल्हा सहाय्यक निबंधक वर्ग-१ या नावाचे खातेधारक यांचे खाते क्र. ११२३६८१२६० चा २० लाख
२९ हजार रुपयांचा धनादेश क्र. ०६९०३८ हा जि.के.इन्फोटेक यांच्या नावे १३ मे २०१५ रोजी बँक आॅफ बडोदा येथे तर त्याच क्रमांकाचा १९ लाख ८० हजार ६२० रुपयांचा धनादेश क्र. ०६९०३८ हा श्री बालाजी ट्रेडींग नावाने बनावट धनादेश बनवून ते वटवले होते.