बनावट सह्यांद्वारे उकळले ४१ लाखांचे कर्ज, दादर पोलिसांत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:14 AM2017-12-13T03:14:42+5:302017-12-13T03:14:51+5:30

दादरमधील व्यावसायिकाच्या आईवडिलांच्या बनावट सह्या घेत एका ठगाने चक्क ४१ लाखांचे कर्ज घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. संबंधित व्यावसायिकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

Rs 41 lakh boiled by fake collusion, crime in Dadar police | बनावट सह्यांद्वारे उकळले ४१ लाखांचे कर्ज, दादर पोलिसांत गुन्हा

बनावट सह्यांद्वारे उकळले ४१ लाखांचे कर्ज, दादर पोलिसांत गुन्हा

Next

मुंबई : दादरमधील व्यावसायिकाच्या आईवडिलांच्या बनावट सह्या घेत एका ठगाने चक्क ४१ लाखांचे कर्ज घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. संबंधित व्यावसायिकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर पश्चिमेकडील एस. के. बोलेरोड परिसरात कुपुजा जयकिशन धिंंग्रा हे कुटुंबीयांसोबत राहतात. एल्फिन्स्टन परिसरात त्यांचा व्यवसाय आहे.
धिंग्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून, त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड
या ओळखपत्रांचा वापर करत
ठगांनी त्यांच्या आईवडिलांच्या
बनावट सह्या करत दस्तावेज तयार केले.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅपिटल फार्स्ट आणि कॅपिटल फ्लोटमधून धिंंग्रा यांच्या कंपनीच्या नावाने ४१ लाख ३७ हजार ३२९ रुपयांचे कर्ज लाटले. जानेवारी २०११ ते ३० सप्टेंबर २०१७ दरम्यान ठगाने हा प्रताप केला आहे.

Web Title: Rs 41 lakh boiled by fake collusion, crime in Dadar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा