मुंबई : दादरमधील व्यावसायिकाच्या आईवडिलांच्या बनावट सह्या घेत एका ठगाने चक्क ४१ लाखांचे कर्ज घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. संबंधित व्यावसायिकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर पश्चिमेकडील एस. के. बोलेरोड परिसरात कुपुजा जयकिशन धिंंग्रा हे कुटुंबीयांसोबत राहतात. एल्फिन्स्टन परिसरात त्यांचा व्यवसाय आहे.धिंग्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून, त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्डया ओळखपत्रांचा वापर करतठगांनी त्यांच्या आईवडिलांच्याबनावट सह्या करत दस्तावेज तयार केले.या बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅपिटल फार्स्ट आणि कॅपिटल फ्लोटमधून धिंंग्रा यांच्या कंपनीच्या नावाने ४१ लाख ३७ हजार ३२९ रुपयांचे कर्ज लाटले. जानेवारी २०११ ते ३० सप्टेंबर २०१७ दरम्यान ठगाने हा प्रताप केला आहे.
बनावट सह्यांद्वारे उकळले ४१ लाखांचे कर्ज, दादर पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:14 AM