Join us

व्यापारी नफ्याला भूलला; ६ कोटी रुपयांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 1:52 PM

याबात पोलिस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : गुंतवणुकीचा नावाखाली दादरमधील व्यावसायिकाची सहा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याबात पोलिस अधिक तपास करत आहेत.

वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे देवेंद्रराम कृष्ण मानगावकर (५७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, ए. बी. राजमुद्रा एंटरप्रायजेसचे प्रोप्रायटर यांचे मालक अमोल जयवंत भोसले यांनी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून गुंतवणुकीवर ३६ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, मानगावकर यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांनी एकूण ६ कोटी १० गुंतवले. मात्र, परतावा काही मिळालेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 आपल्याला काहीही लाभ झालेला नाही आणि कुठलाही परतावा न मिळाल्याने तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पैसे परत मागताच आरोपीने टाळाटाळ सुरू केली. अखेर, फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :धोकेबाजीगुन्हेगारीपोलिस