मोबाइल टॉवरमधून बेस्टला ६६ कोटी रुपये
By admin | Published: November 15, 2016 06:38 AM2016-11-15T06:38:58+5:302016-11-15T06:38:58+5:30
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कमाईचा आणखी एक मार्ग सापडला आहे. मोकळे भूखंड, इमारतीवरील गच्च्या मोबाईल कंपन्यांच्या
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कमाईचा आणखी एक मार्ग सापडला आहे. मोकळे भूखंड, इमारतीवरील गच्च्या मोबाईल कंपन्यांच्या टॉवर्ससाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. अशी १४० ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी बेस्टमार्फत भाड्याने देण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील दहा वर्षांच्या या महसुलाच्या रुपाने बेस्टच्या तिजोरीत ६६ कोटी ६९ लाख रुपये जमा होणार आहेत.
उत्पन्न वाढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने वर्षभरात तीनवेळा केलेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशीवर्ग घटले. याचा विपरीत परिणाम बेस्टच्या उत्पन्नावर झाला. त्याचवेळी परिवहन तूट वसुली (टीडीएलआर) बंद करण्यात आल्यामुळे बेस्टला साडेसहाशे
कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे अन्य मार्गाने उत्पन्न वाढविण्यासाठी बेस्टने अनेक पर्याय अवलंबिण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार मोकळे भूखंड, इमारतीवरील गच्च्या दहा वर्षांच्या भाडेतत्वावर मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी देण्यात येणार आहेत. यासाठी बेस्टने काढलेल्या निविदेला रिलायन्सच्या जिओ इन्फोकॉने या कंपनीने प्रतिसाद दिला आहे.
या मार्गाने बेस्टला तब्बल ६६ कोटी ६९ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने बेस्ट समितीच्या
पटलावर मंजुरीसाठी मांडला आहे. (प्रतिनिधी)