Join us

नोकरानेच केली चार्जर घेण्याच्या बहाण्याने ७२ लाखांची लूट;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:05 AM

गिरगाव येथील घटना, गुन्हा दाखलनोकरानेच केली चार्जर घेण्याच्या बहाण्याने ७२ लाखांची लूट;गिरगाव येथील घटना, गुन्हा दाखललोकमत ...

गिरगाव येथील घटना, गुन्हा दाखल

नोकरानेच केली चार्जर घेण्याच्या बहाण्याने ७२ लाखांची लूट;

गिरगाव येथील घटना, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चार्जर घेण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या नोकरानेच अन्य दोन साथीदारांच्या मदतीने ७२ लाखांची लूट केल्याची घटना गिरगावमध्ये घडली. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात त्रिकुटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गिरगावमध्ये तक्रारदार व्यावसायिक कुटुंबीय राहण्यास आहे. त्यांच्या कपड्याच्या दुकानात दोन आणि मेटल दुकानात एक असे एकूण ३ जण काम करतात. जेवणाचा डबा नेणे किंवा कार्यालयीन कामासाठी हे नोकर व्यावसायिकाच्या घरी येत असत. नेहमीप्रमाणे २ एप्रिल रोजी पती आणि मुले कामावर निघून गेल्यावर ४९ वर्षीय पत्नी मंजुबेन शेठ या घरात एकट्या होत्या.

त्यांच्या कपड्याच्या दुकानात काम करणारा नरेश चौधरी (२३) हा दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्यांच्या घरी आला. त्याने मोबाइल चार्जर नेण्यासाठी आल्याचे बंद दरवाजा ठाेठावून मंजुबेन यांना सांगितले. त्यानुसार मंजुबेन यांनी दरवाजा उघडून त्याला आत घेतले आणि त्या स्वयंपाकगृहात निघून गेल्या. काही समजण्याच्या आतच त्याचे अन्य दोन साथीदार घरात शिरले आणि त्यांनी मंजुबेन यांचे नाकतोंड हाताने दाबून धरले. यामुळे त्या बेशुद्ध हाेऊन खाली कोसळल्या. त्यानंतर चाैधरी आणि त्याच्या साथीदारांनी घरातील ७२ लाख ८८ हजार ६२० रुपये पळवले. मंजुबेन शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार फाेन करून कुटुंबीयांना सांगताच त्यांनी घर गाठले. घरातील रोकड चोरीला गेल्याचे समजताच व्ही. पी. रोड पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पाेलीस अधिक तपास करत आहेत.

* यापूर्वीची घटना

घराकामासाठी ठेवलेले नोकरच चोर निघाल्याचा प्रकार गावदेवी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आला. यात, लाल महादेवी मुखिया, अनहुल मुखिया यांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात त्यांनी ते घरकाम करत असलेल्या घरातील ५५ लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केला होता. गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तपासाअंती त्यांना बेड्या ठोकल्या. दोघेही बिहारच्या दरभंगा भागातील रहिवासी आहेत.

............................