मुंबई :
दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाशेजारी असलेल्या भूखंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दावा केला आहे. येथे १९६७ पासून संघाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात येत असून सध्या स्मृतीस्थळाशेजारील अतिक्रमणामुळे येत आहे. त्यामुळे प्रलंबित भाडेपट्टी घेऊन नाना- नानी पार्कशेजारी भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आरएसएसच्या दादर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत महापालिकेचे उपायुक्त सुधार विभागाची सुधार समितीचे उपाय यांना निवेदन देण्यात आले आहे.
दादर शाखेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पार्कजवळील १,७५५ चौरस मीटर भूखंडाचे व्हीएलटी पद्धतीने भाडे १९६७ पासून २००७ पर्यंत भरले आहे. मात्र त्यानंतर सदरच्या जागेचे आरेखन न झाल्याचे सांगून पालिकेने भाडे घेतलेले नाही. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आरेखन निश्चित करून भाडे भरून घ्यावे. आम्हाला नाना-नानी पार्कच्या शेजारील भूखंड देण्यात यावा.
भूखंड देण्यात अडचणआरएसएसच्या मागणीबाबत सहाय्यक आयुक्तांनी मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशा सूचना उपायुक्तांनी केल्या आहेत. मात्र मैदानाचा वापर अन्य कामांसाठी वाढत असल्याने क्रीडाप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे हा भूखंड देण्यात अडचणी असल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले.