आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 09:46 PM2021-09-01T21:46:54+5:302021-09-01T21:47:27+5:30

शुक्रवार मध्यरात्रीपासून नियम लागू

rt pcr testing is mandatory for international travelers at their own cost | आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कोविड-१९ विषाणूचे नवीन व वेगाने फैलावणारे प्रकार आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करुन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांना आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून हा नियम लागू असणार आहे.

केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, हवाई प्रवास करुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची तरतूद रद्द करण्यात आली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार यापूर्वीचे परिपत्रक रद्द केल्याने दोन्ही कोविड डोस झालेले प्रवासी, ६५ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांनाही यातून सूट मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या सर्व प्रवाशांना 
मागील ७२ तासांमधील निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे आवश्यक असणार आहे.

असे आहेत नवीन नियम...

- ७२ तासांपूर्वीचा कोविड निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल. 

- सर्व प्रवाशांनी स्वयंघोषणा-पत्र तसेच हमीपत्र भरुन विमानतळावर नियुक्त संबंधित अधिकार्‍यांकडे देणे आवश्यक असेल. या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.

- सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार प्रति चाचणी ६०० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल. चाचण्या वेगाने करणे शक्य व्हावे म्हणून प्रत्येक तासाला सुमारे ६०० प्रवाशांची चाचणी करता येईल. 
 

Web Title: rt pcr testing is mandatory for international travelers at their own cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.