बेस्ट बसच्या भाडेकपातीला आरटीएची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:50 AM2019-07-04T04:50:23+5:302019-07-04T04:50:33+5:30
बेस्ट प्रशासनाने पाठविलेल्या भाडेकपातीच्या प्रस्तावाला बुधवारी आरटीएने मंजुरी दिली.
Next
मुंबई : पालिका महासभेच्या मंजुरीनंतर प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानेही (आरटीए) बेस्ट उपक्रमाच्या भाडेकपातीवर मंगळवारी शिक्कामोर्तब केले. यामुळे दोन ते तीन दिवसांत बसभाड्याचे नवीन दर लागू होणार आहेत.
त्यानुसार साध्या बसचे किमान प्रवासी भाडे पाच रुपये तर वातानुकूलित बसगाड्यांचे भाडे सहा रुपये होणार आहे. बेस्ट प्रशासनाने पाठविलेल्या भाडेकपातीच्या प्रस्तावाला बुधवारी आरटीएने मंजुरी दिली.
याबाबतची अधिसूचना येण्यास तसेच इतर तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर बसभाडेकपात लागू होईल.