आरटीई प्रवेशाला ३ मार्चपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:07 AM2021-02-27T04:07:46+5:302021-02-27T04:07:46+5:30
पालक करू शकणार अर्ज, २१ मार्चपर्यंत मुदत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारांतर्गत खासगी ...
पालक करू शकणार अर्ज, २१ मार्चपर्यंत मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी आरटीईअंतर्गत राबवण्यात येणार्या प्रवेशप्रक्रियेला ३ मार्चपासून सुरुवात होणार असून, पालकांना अर्ज भरता येतील.
राज्यातील सर्व शाळांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची तारीख जाहीर केली. त्यानुसार, ३ मार्चपासून ते २१ मार्चपर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज करता येतील. आरटीई प्रवेशासाठी पालकांना https://rte25admission.maharashtra.gov.in आणि https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येतील. आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून ९४३१ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये ९६ हजार ८०१ जागा आहेत.
मुंबई जिल्ह्यात गेल्या वर्षी ३६७ शाळांनी नोंदणी केली होती. त्यातून ७ हजार २ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या होत्या. यंदा मात्र शाळांच्या नोंदणीत घट झाली असून, केवळ ३५२ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी केवळ ६,४६३ जागा उपलब्ध होऊ शकतील.
.....
आरटीई २०२१-२२-शाळांची संख्या-पहिलीसाठी जागा-पूर्व प्राथमिक जागा
राज्य मंडळ - २९०-४८०९- ४१८
इतर बोर्ड - ६२- ११७२- ६४
एकूण - ३५२- ५९८१- ४८२