मुंबई : यंदा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेला पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून उपलब्ध जागांच्या तिप्पट अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी आतापर्यंत सर्वाधिक तीन लाख १४ हजार ३९५ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना १७ मार्चपर्यंत भरावयाचे होते. मात्र, काही कागदपत्रे मिळवण्यास विलंब होत असल्याने पालकांनी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ मागितली होती. त्याची दखल घेत संचालनालयाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत अर्जासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
आरटीई स्वयंअर्थसाहायित, खासगी विनाअनुदानित खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. संबंधित शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला १ मार्चपासून सुरुवात झाली. तर पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी १७ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार होते. आतापर्यंत तब्बल सव्वातीन लाख अर्ज आल्याची प्राथमिक माहिती आहे, तरीही पालक मुदतवाढीची मागणी करीत होते.
जिल्हानिहाय अर्जजिल्हा जागा अर्जसंभाजीनगर ४,०७३ १७,५८५कोल्हापूर ३,२७० ३,९३६पुणे १५,६५५ ६८,३६१नाशिक ४,८५४ १८,९१४सातारा १,८२१ ३,९७३मुंबई ६,५६९ १५,८२५
पालकांच्या मागणीनुसार सध्या मुदतवाढ देण्यात आली असली तरी २५ मार्चनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही; याची नोंद घ्यावी. - शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालक