आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशांना १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:06+5:302021-01-13T04:14:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मात्र, अनेक विद्यार्थी कोरोनामुळे गावी गेल्यामुळे संपर्क होऊ न शकल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. मात्र, अनेक विद्यार्थी कोरोनामुळे गावी गेल्यामुळे संपर्क होऊ न शकल्याने प्रवेशापासून वंचित आहेत. याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रतीक्षा यादीतील प्रवेश निश्चितीसाठी १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
आरटीई २५ टक्केअंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यभरातून प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या ४१,१९१ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत १७,७७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. मागील काही वर्षांतील आकडेवारी पाहता आरटीई प्रवेशाची संख्या यंदा सर्वाधिक असल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी देण्यात आली आहे. नियमित आणि प्रतीक्षा यादीतील असे मिळून आतापर्यंत राज्यात आरटीई प्रवेशाची एकूण संख्या ८५ हजारांहून अधिक आहे.
.............................