Join us

आरटीआय कार्यकर्त्याला समाजकंटकांच्या धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2016 6:03 AM

कॉपीराइट कायद्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून पोलिसांत तक्रार करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला समाजकंटकांकडून धमक्या

मुंबई : कॉपीराइट कायद्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून पोलिसांत तक्रार करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला समाजकंटकांकडून धमक्या दिल्या जात आहेत. मात्र पोलिसांकडून योग्य दिशेने कार्यवाही होत नसून संरक्षणही पुरवले जात नसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते याकूब अब्दुल हमीद शेख यांनी केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना शेख म्हणाले की, बनावट घड्याळे मुसाफिरखाना येथे कोट्यवधी किमतीला विकली जात होती. या प्रकरणी गुन्हाही नोंदवला. तक्रारदार असल्याने काही व्यक्ती फोन करून धमक्या देत आहेत. या धमक्यांविरोधात पोलिसांत तक्रार करत संरक्षणाची मागणी केली. मात्र संरक्षण न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)