मुंबई : राज्यातील वाहन चालकांना तक्रार करणे सोयीचे व्हावे, यासाठी परिवहन विभागाने ‘आरटीओ महाराष्ट्र’ हे नवीन अॅप चालकांच्या सेवेत दाखल केले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती देण्यासाठी अॅपमध्ये विशेष (एसओएस) बटणाची व्यवस्था आहे.विविध कामांसाठी नागरिक आरटीओमध्ये गर्दी करतात. त्यामुळे कार्यालयांबाहेर मोठ्या रांगा लागतात. परिणामी, रांगेपासून सुटका मिळवण्यासाठी ‘आरटीओ महाराष्ट्र’ हे अॅप सुरू करण्यात आले आहे.अॅपमध्ये राज्यातील रिक्षा-टॅक्सी व अन्य वाहनांविरुद्ध तक्रार करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना आपत्कालीन परिस्थितीत नातेवाइकांना माहिती देण्यासाठी अथवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ‘एसओएस’ क्लिक ही सेवादेखील पुरवण्यात आली आहे. अॅपमुळे रिक्षा-टॅक्सी आणि खासगी वाहतूकदारांकडून होणाºया प्रवासी लुबाडणुकीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
‘आरटीओ महाराष्ट्र’ सेवेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 4:55 AM