महसुलातील घट भरुन काढण्यासाठी थकीत कर जमा करण्यावर आरटीओचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 03:24 PM2020-08-10T15:24:52+5:302020-08-10T15:25:42+5:30
महसुलातील तुट भरुन काढण्यासाठी आता ठाणे आरटीओने जुनी वाहन कर थकीत वसुलीवर भर देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार जुनी थकबाकी कर धारकांना डिमांड नोटीसा पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे. परंतु यातून कीती उत्पन्न मिळेल याबाबत अद्यापही साशंकता आहे.
ठाणे : कोरोनामुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. तिकडे आरटीओला देखील या कोरोनाचा फटका बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून जुनी वाहन कर थकीत वसुलीवर भर देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार जुनी थकबाकी कर धारकांना डिमांड नोटीसा पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तीन ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. दरवर्षी जिल्ह्यात नवीन वाहन खरेदीच्या माध्यमातून मोठा महसूल प्रादेशिक परिवहन विभागाला मिळत असतो. या वाहन विक्र ीच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन विभागाला रस्ते कर, पर्यावरण कर, वाहननोंदणी कर, परवाना नुतणीकरण कर, परमीट कर अशा विविध करांच्या स्वरूपात कोट्यावधी रु पयांचा महसूल मिळतो. तर जानेवारी ते जुलै या कालावधीत बस, जड-अवजड वाहने आणि चार चाकी गाड्यांची खेरदी-विक्र ी होते. त्यामुळे या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या तीन उपप्रादेशिक कार्यालयांमधून २५० कोटींहून अधिक महसूल मिळात होता. मात्र, यंदा कोरोनाच्या पाशर््वभूमीवर वाहन विक्र ीत कमालीची घट झाल्यामुळे त्याचा परिणाम महसुलावर झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत यंदाच्या वर्षी महसुलात घट झाली आहे. दरम्यान, महसुलातील झालेली घट भरून काढण्यासाठी जुने थकीत कर वाहन धारकांना डिमांड नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या जुन्या थाकीबाकी धारकांकडून प्राप्त होणाऱ्या उत्पनातून महसुलातील घट भरून काढण्यासाठी मदत होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोरोनाच्या संकटामुळे ग्राहकांचा नवीन वाहन खरेदीकडे कल कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाला कराच्या माध्यमातून मिळणाºया महसूलात मोठी घट झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी जुने कर थकीत वाहन धारकांना डिमांड नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
- रवी गायकवाड, प्रादेशिक परिवहन विभाग प्रमुख, ठाणे