Join us  

मोठी बातमी! महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 5:42 PM

वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणा-या कोणत्याही व्यक्तीस  आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेला असेल.

ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताना, प्रवासात आणि गंतव्यस्थानावर कोविड -१९ योग्य वर्तन पालनाच्या सूचना देण्यात येत आहे.  राज्य सरकारच्या 'ब्रेक द चैन' मोहिमेनुसार, वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणा-या कोणत्याही व्यक्तीस  आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेला असेल.

दि. १८ एप्रिल २०२१ आणि १ मे २०२१ रोजीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या  'संवेदनशील उत्पत्ती' च्या ठिकाणच्या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेली सर्व निर्बंधे देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणार्‍या प्रत्येकाला लागू असतील. 

राज्यस्तरीय नवीनतम सूचना http://contents.irctc.co.in/en/stateWiseAdvisory.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  

लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मार्गदर्शक सूचना तपासण्याचे तसेच स्वतःच्या  आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड -१९  योग्य वर्तन अनुसरण करण्याचे पुन्हा सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस