सेना उपविभागप्रमुखावर चेंबूरमध्ये खंडणीचा गुन्हा

By admin | Published: March 31, 2016 02:23 AM2016-03-31T02:23:02+5:302016-03-31T02:23:02+5:30

गॅरेज मालकाकडून पाच हजारांचा हप्ता मागणारा चेंबूरमधील शिवसेनेचा उपविभागप्रमुख अविनाश राणे याच्यावर गोवंडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. मात्र, चौकशीनंतरच त्याला

Rule of extortion in Chembur on army sub-division head | सेना उपविभागप्रमुखावर चेंबूरमध्ये खंडणीचा गुन्हा

सेना उपविभागप्रमुखावर चेंबूरमध्ये खंडणीचा गुन्हा

Next

मुंबई : गॅरेज मालकाकडून पाच हजारांचा हप्ता मागणारा चेंबूरमधील शिवसेनेचा उपविभागप्रमुख अविनाश राणे याच्यावर गोवंडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. मात्र, चौकशीनंतरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती गोवंडी पोलिसांनी दिली आहे.
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालय परिसरात दोन महिन्यांपासून भाजपाचे १३४ चे प्रभाग अध्यक्ष रिंकेशकुमार झा यांचे गॅरेज आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उपविभागप्रमुख अविनाश राणे त्याच्या साथीदारांसह तेथे गेला. जर हे गॅरेज सुरू ठेवायचे असेल तर महिन्याला पाच हजारांचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी त्याने झा यांना दिली.
त्याच्या साथीदारांनी गॅरेजमधील कामगारांना मारहाणही केली. याबाबत झा यांनी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत विचारले असता गोवंडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम कोळेकर यांनी ‘तपास सुरू असून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल’, असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Rule of extortion in Chembur on army sub-division head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.