मुंबई : अनाथ बाळाला आई मिळत असेल व त्या दोघांमध्ये जवळीक होत असल्यास बाळ दत्तक घेण्याचे नियम शिथिल असायला हवेत, असे मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले.एका जोडप्याला बाळ दत्तक घ्यायाचे आहे. या जोडप्यातील महिला परदेशी नागरिक आहे. त्यामुळे दत्तक केंद्राने यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले. याविरोधात या जोडप्याने याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने हे मत व्यक्त केले. मात्र दत्तक घेण्यासाठी सहा हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. बाळाची संपूर्ण काळजी घेतली जाईल, याची शहानिशा केल्याशिवाय दत्तक दिले जात नाही, असा दावा शासनाने केला आहे. यावरील पुढील सुनावणी एका आठवड्याने होणार आहे. (प्रतिनिधी)
बाळ दत्तक घेण्याचे नियम कठोर नकोत
By admin | Published: June 28, 2015 12:51 AM