मुंबई : नेतृत्वाचा अभाव, चुकीची आर्थिक धोरणे आणि कुप्रशासन या कारणांमुळे आपला देश हा गरीब लोकसंख्येचा श्रीमंत देश आहे. विद्यार्थ्यांनी गरिबांप्रति सहानुभूतीची भावना बाळगावी आणि समाजात काम करताना कर्तव्य आणि प्रशासन यांच्यात अडथळे आल्यास नियम मोडू नका, मात्र लोकहितासाठी ते वाकवता येतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वेलिंगकर संस्थेच्या ‘वी स्कूल’च्या पदवीदान समारंभादरम्यान ते बोलत होते.नितीन गडकरी म्हणाले, पैसे कमावणे दुय्यम असून, आयुष्याचे ध्येय पैसा कमावणे इतकेच असू नये. विद्यार्थ्यांनी नावीन्य, संशोधन आणि दृष्टिकोनाला प्राधान्य दिले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आणि शोधांच्या माध्यमातून समाजात वेगाने बदल होत आहेत. मात्र आर्थिक बलाशिवाय देशाला आकार देणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याच्या कामी इंजिनाची भूमिका बजावावी. विद्यार्थी, शिक्षक, शालेय वातावरण तसेच अभ्यासाच्या अनुपलब्धतेमुळे ग्रामीण भागातील शाळांची स्थिती बिकट असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
नियम लोकहितासाठी वाकवता येतील
By admin | Published: March 17, 2017 5:07 AM