मल्टिप्लेक्समध्ये नियमांना फासला हरताळ; मनसेला दिलेले आश्वासनही मल्टिप्लेक्स चालकांनी धुडकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 04:35 AM2018-08-03T04:35:34+5:302018-08-03T04:36:28+5:30

‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी मुंबईच्या विविध भागांतील मल्टिप्लेक्समध्ये जाऊन खाद्यपदार्थांच्या किमती खरोखर कमी झाल्या आहेत का, बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्याचे आश्वासन पाळले जाते आहे का, याची पाहणी केल्यावर धक्कादायक चित्र उभे राहिले...

The rules in multiplexes break through; MNS promises to be rejected by multiplex operators | मल्टिप्लेक्समध्ये नियमांना फासला हरताळ; मनसेला दिलेले आश्वासनही मल्टिप्लेक्स चालकांनी धुडकावले

मल्टिप्लेक्समध्ये नियमांना फासला हरताळ; मनसेला दिलेले आश्वासनही मल्टिप्लेक्स चालकांनी धुडकावले

Next

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे अवाजवी दर आणि बाहेरील खाद्यपदार्थांना मनाई केल्याचा विषय सध्या उच्च न्यायालयात आहे. त्याचवेळी या मुद्द्यावर मनसेने आंदोलन उभारल्याने मल्टिप्लेक्स चालकांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सर्वाधिक मागणी असलेले खाद्यपदार्थ, पाण्याचे दर कमी करणे, घरचे खाद्यपदार्थ नेऊ देण्यास स्वत:हून सहमती दर्शवली आणि १ आॅगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी मुंबईच्या विविध भागांतील मल्टिप्लेक्समध्ये जाऊन खाद्यपदार्थांच्या किमती खरोखर कमी झाल्या आहेत का, बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्याचे आश्वासन पाळले जाते आहे का, याची पाहणी केल्यावर धक्कादायक चित्र उभे राहिले...

खाद्यपदार्थांचे दर चढेच!
मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर लालबाग येथील जयहिंद मुक्ता या चित्रपटगृहात विकण्यात येणाºया खाद्यपदार्थांच्या दरात कपात करण्यात आली. मात्र अद्यापही येथील खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे ‘लोकमत’ रिअ‍ॅलिटी चेकमध्ये समोर आले आहे. चित्रपटगृहामधील खाद्यपदार्थांचे दर २० ते ३० टक्क्यांनी कमी केल्यानंतरही प्रेक्षकांना परवडणारे नाहीत.
चित्रपटगृहातील कर्मचाºयाने सांगितले की, १ आॅगस्टपासून दरकपात लागू झालेली आहे. त्याप्रमाणेच प्रेक्षकांकडून दर आकारले जात आहेत. मात्र मेनू कार्डवरील दर मात्र जुनेच असल्याचे दिसले. त्यावर काही पदार्थांचे नवे दर लिहिलेले असून उरलेल्या पदार्थांचे नवे दरही आजच बदलणार असल्याचे कर्मचाºयाने स्पष्ट केले. मात्र नव्या दरपत्रकातही पॉपकॉर्नसाठी ५० रुपयांपासून २२० रुपये आकारण्यात येत आहेत. तर ३०० मिली शीतपेयासाठी ५० रुपये, तर ६५० मिली शीतपेयासाठी तब्बल १४० रुपये दर ठरवण्यात आले आहेत. आइस्क्रीमसाठी मात्र या ठिकाणी ग्राहकांकडून छापील किमतीनुसारच आकारणी होत असल्याचे दिसून आले.
बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात आणण्यास या ठिकाणी परवानगी देण्यात येते. मात्र चित्रपटगृहाच्या तळमजल्याला असलेल्या लॉकरमध्ये किंवा फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवावे लागतात. तसेच चित्रपटाच्या मध्यांतरामध्ये हे पदार्थ तळमजल्याला बसून खाऊ दिले जातात. चित्रपटगृहात पदार्थ नेण्यास बंदी आहे. उच्च न्यायालयात अद्याप याचिका प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय आल्यानंतरच चित्रपटगृहात पदार्थ नेण्यास परवानगी देणार असल्याचे पत्रकही दर्शनी भागात लावण्यात आले होते.

काही ठिकाणी बाहेरील पदार्थ नेण्यास परवानगी
कांदिवली पश्चिमेकडील सोना शॉपिंग सेंटर येथील पीव्हीआर सिनेमा थिएटरमध्ये फक्त घरातील भाजी पोळी, पराठा, घरगुती सँडविच या वस्तू नेण्यासाठी परवानगी आहे. मात्र बाहेरील वडापाव, समोसा, वेफर्स नेण्यास मनाई आहे. तसेच लहान मुलांसाठी लागणारे खाद्यपदार्थ आणि पाण्याची बॉटल सिनेमागृहात नेऊ दिली जाते, अशी माहिती येथील सुरक्षारक्षकांनी दिली.
कांदिवली पूर्वेकडील ग्रोव्हेल्स मॉलमधील पीव्हीआर सिनेमामध्ये बाहेरील पदार्थ नेण्यास परवानगी असल्याचे तिकीट विक्रेत्यांनी सांगितले. अंधेरीमधील पश्चिम दु्रतगती महामार्गावरील इस्क्वेअर सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मान्यता आहे. सँडविच, वेफर्स, पाण्याची बॉटल इत्यादी खाद्यपदार्थ सिनेरसिक घेऊन जातात, अशी माहिती इस्क्वेअर सिनेमागृहातील कर्मचाºयाने दिली. मल्टिप्लेक्समध्ये नियमांना फासला हरताळ; मनसेला दिलेले आश्वासनही मल्टिप्लेक्स चालकांनी धुडकावले

नक्षत्रमध्ये बाहेरील पदार्थांना ‘नो एन्ट्री’
दादर पश्चिमेला स्टेशनला लागून असलेल्या नक्षत्र मॉलमधील थिएटरमध्ये खादपदार्थांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनीच कमी केल्या आहेत. मनसेने दिलेल्या इशाºयानंतरही या थिएटरमधील परिस्थिती जैसे थेच आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत जरी थोडाफार बदल करण्यात आला असला तरी थिएटरच्या प्रवेशद्वारावरच बाहेरून आणल्या जाणाºया खाद्यपदार्थांना जप्त करण्यात येत आहे. बाहेरील खाद्यपदार्थ थिएटरमध्ये घेऊन जाण्यासाठी परवानगी असतानाही दादरच्या नक्षत्र थिएटरमध्ये मात्र हे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास अजूनही मज्जाव करण्यात आला आहे. येथे पॉपकॉर्नच्या एका पॅकेटची विक्री यापूर्वी १४० रुपयांना केली जात होती, ती आता कमी करून १०० रुपयांवर आणण्यात आली आहे. समोसा प्लेट ही आधी ८० रुपयांनी दिली जात होती त्यात फक्त १० रुपये कमी केले आहेत. पाण्याची बाटली, चहा, कॉफी, सँडविच यांच्या किमतीही त्याच प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियम करूनही त्याला हरताळ फासण्याचे काम नक्षत्र थिएटरमध्ये सुरू असल्याचे येथे येणाºया प्रेक्षकांचे म्हणणे आहे. यावर नक्षत्र थिएटर्सचे व्यवस्थापक परशुराम खांबे यांनी सांगितले की, शासनाकडून काही आदेश आल्यास त्यानुसार धोरणामध्ये बदल करण्यात येईल. आम्हाला शासनाकडून कोणताही जीएआर याबाबतीत मिळालेला नसून जोपर्यंत आम्हाला असा जीएआर मिळत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही.

फिनिक्समध्ये ग्राहकांची लूट सुरूच
कुर्ला पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग येथील फिनिक्स मॉलमधील पीव्हीआर थिएटर्समध्ये ग्राहकांची लूट सुरू आहे. येथे पॉपकॉर्न, पाण्याची बाटली, समोसा आणि इतर खाद्यपदार्थांचे दर कमी केलेले नाहीत. थिएटर्समध्ये बाहेरचे पदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे. ४६ गॅॅ्रम पॉपकॉर्न २०० रुपये, पाण्याची बाटली ४० ते ६० रुपयांनी विकली जाते. तर दोन समोसे ८० रुपयांना विकले जातात. सोमवार ते शुक्रवार या दिवशी ग्राहकांसाठी खाद्यपदार्थांवर आॅफर्स देत खाद्यपदार्थांच्या किंमती १० ते २० रुपयांनी कमी केल्या जातात. शनिवारी आणि रविवारी खाद्यपदार्थांच्या किमती अव्वाच्या सव्वा असतात. मनसे प्रभाग १६६ चे उपशाखा अध्यक्ष संतोष उघडे यांनी सांगितले की, आधीचे दर आणि आताचे दर यामध्ये कोणताही फरक नाही. १ आॅगस्टपासून थिएटर्समधील

Web Title: The rules in multiplexes break through; MNS promises to be rejected by multiplex operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.