अफवा... छुप्या मोहीमेमुळे गर्दीला खतपाणी मिळाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:29 AM2020-04-15T03:29:55+5:302020-04-15T03:30:10+5:30
मजुरांचा आक्रोश : साहब अब मदत नही घर जाने दो
मुंबई : लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावल्याने हजारो मजूर रस्त्यावर उतरले. यावेळी साहब अब मदत नही घर जानेदो म्हणत त्यांनी ठीय्या केला. अफवा... छुप्या मोहीमेमुळे गर्दीला खतपाणी मिळाल्याचा संशय वर्तविन्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी देशातील लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवेसह सर्वच प्रवासी वाहतूकही लॉक आहेत. त्यामुळे अनेक जण मुंबईसह विविध भागात अड़कून आहेत. यातच सर्वात जास्त फटका हातावर पोट असाणाऱ्या मजूरांना बसत आहे.
यात, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यातून मुंबईत नोकरीसाठी आलेल्याचे रोजगार हिरावल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. त्यात घरभाड़ेही द्यायला नसल्याने काहीनी पदपथावर संसार थाटला. तर काहीनी पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अडकलेल्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळेल, अशी आशा अनेकांना होती. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्राने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवताना त्याची आणखी कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे धोरण अवलंबले आहे. अशात वांद्रे पुर्वेकडे घास बाजार ही तयार कपड्यांची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ आहे. त्याशिवाय येथे जरी काम, चप्पल, बॅग असे विविध उद्योग आणि व्यवसाय आहेत. जेथे व्यवसाय म्हणजे तेथेच उत्पादन करून मजूरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो मजूर या भागात राहण्यास आहेत.
वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला बेस्ट बस परिसरात नेहमीप्रमाने स्वयंसेवी संस्थेकडून होणार असलेल्यां धान्य वाटपासाठी मजूर जमात होतेच. त्यात अचानक वाढलेल्या गर्दीने भर घातली.
आता जेवण नाही तर गाव सोडा, म्हणत ४ च्या सुमारास हजारोंच्या संख्येने मजूर एकत्र आले. याबाबत समजताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना समजावणयाचा प्रयत्न केला. अशात वाढती गर्दी लक्षात घेत आणखीन कुमक मागविन्यात आली. या गर्दीबाबत स्थानिकांना समजताच जवळच्या परिसरातील लोकांनी ही गर्दी केली. पोलिसांनी स्थानिक नेत्याच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यात गर्दीतले यात टवाळखोर आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठिमार करत त्यांना घरी पाठवले. मोठ्या प्रमाणात पळापळ झाल्याने गोंधळ उडाला होता.
साहब अब खाना नही सिर्फ घर जानेदो..़ म्हणत अनेकांनी टाहो फोड़ला. पोलिसांनी अथक प्रयत्न करत सायंकाळी साडे पाचच्या सुमारास गर्दीवर नियंत्रण आणले.'यात 'परराज्यातील लोकांना घरी परतण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.' या दोन अफवां सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने ही गर्दी जमल्याचीही चर्चा येथे होत आहे. तर दुसरीकडे ब्रेकिंगच्या नावाखाली मराठी वाहिनीने देखील याबाबतच्या गाड्या सोडण्यात येणारअसल्याचचे वृत्त दिल्याने गर्दित भर पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
...गर्दी जमलीच कशी ?
वांद्रे पूर्व पश्चिमेकडील मजूर यात सहभागी झाले होते. यात पूर्वेकड़ून काही जण पश्चिमेकडे आल्याची चर्चा आहे. मात्र एवढ्या मोठ्याा प्रमाणात ही गर्दी जमलीच कशी? पोलिसांना याबाबत काहीच कसे समजले नाही. एकीकडे कोरोनामुळे सगळीकड़े नाकाबंदी, गस्त सुरु असताना या गर्दीबाबत पोलीस अनभिन्य कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा, पोलीस उपायुक्त अभिषेख त्रिमुखे, मंजुनाथ सिंगे यांनी एकत्रित बैठक घेतली. याबाबत ते अधिक चौकशी करत आहेत.
जमवाविरोधात गुन्हा
च्वांद्रे येथे जमलेल्या ८०० ते १००० अनोळखी व्यक्तींच्या जमावाविरोधात स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सरकारी कर्तव्यात अडथळा, दंगल आदी आरोप जमावावर ठेवण्यात आले आहेत. याशिवाय साथरोग कायद्यातील कलमांचाही समावेश असल्याचे अशोक यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचचेही त्यांनी नमूद केले.
...अशीही मोहीम
फेसबुकवरून विनय दुबे नावाच्या व्यक्तीने मजुरानो उद्देशुन एक व्हिडीओ १२ एप्रिल रोजी पोस्ट केला आहे. यात त्याने मजूराना आता मदतीसाठी नाही तर गावी जाण्यासाठी लढणयाचे आवाहन केले. शिवाय याविरुद्ध मोहीम छेड़णयासाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक शेअर केला आहे. या व्हिडिओला १६ हजारांहुन अधिक जणांनी ही पोस्ट शेअर केली होती. तसेच यापुर्वी परप्रातीयासाठी विशेष ४० बसेसची व्यवस्था केल्याचा व्हिडीओही अपलोड केला होता. त्याला २१ हजार लोकांनी शेअर केली. गेल्या अनेक दिवसांपासून त्याने अशा प्रकारे मोहीम छेडल्याचे दिसून आले. त्यामुळे वांद्रे गर्दीमागे त्याचेही कनेक्शन आहे का ? याबाबत पोलीस तपास करत आहेत.